मुंबई इंडियन्सने मंगळवारी (१० नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात पराभूत करुन तब्बल ५व्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवल. तसेच मुंबई इंडियन्स हा ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणारा पहिलाच संघ आहे. दिल्लीला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांचा हा पहिलाच आयपीएलचा अंतिम सामना होता. त्यामुळे दिल्ली उपविजेता ठरलेला एकूण ७ वा संघ ठरला आहे.
या लेखात आपण आत्तापर्यंत आयपीएलमध्ये उपविजेत्या ठरलेल्या संघाबद्दल जाणून घेऊ.
आयपीएलमध्ये आत्तापर्यंतचे उपविजेते –
२००८ – चेन्नई सुपर किंग्स
२००९ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१० – मुंबई इंडियन्स
२०११ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१२ – चेन्नई सुपर किंग्स
२०१३ – चेन्नई सुपर किंग्स
२०१४ – किंग्स इलेव्हन पंजाब
२०१५ – चेन्नई सुपर किंग्स
२०१६ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१७ – रायझिंग पुणे सुपर जायंट्स
२०१८ – सनरायझर्स हैदराबाद
२०१९ – चेन्नई सुपर किंग्स
२०२० – दिल्ली कॅपिटल्स