---Advertisement---

सचिनने वादळी खेळी केलेल्या शारजावर आयपीएलचे किती सामने होणार, वाचा थोडक्यात

---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) रविवारी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा कराला लावल्यानंतर अखेर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे वेळापत्रक जाहीर केले. पहिला सामना अबूधाबी येथे 19  सप्टेंबर रोजी गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.  भारतातील कोविड -१९च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) तीन ठिकाणी दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे यावर्षी जगातील सर्वात मोठी टी 20 लीग होत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुसर्‍या दिवशी दुबईमध्ये सामना रंगणार आहे, तर 21 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे.  22 सप्टेंबर रोजी शारजाहमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाईल.

बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार एकूण दहा दिवस दोन-दोन सामने खेळले जातील. त्यापैकी पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 3 वाजून 30  वाजता व दुसरा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. दुबईत एकूण 24 सामने आयोजित करण्यात आले आहेत. अबूधाबीमध्ये 20 आणि शारजाहमध्ये 12 सामने खेळले जातील. आयपीएल 2020 प्ले ऑफची जागा नंतर जाहीर केली जाईल. अंतिम फेरी 10 नोव्हेंबर रोजी होईल.

सर्व खेळाडू आणि संघाच्या कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूमुळे यंदा युएईमध्ये आल्यानंतर सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे आणि कोरोना टेस्ट करावी लागणार होती. या तिन्ही टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला की ते युएईमध्ये आपल्या सहकारी खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेऊ शकणार होते. आता हे सोपस्कर पार पडले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---