दुबई। शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने तब्बल चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली विजेतेपदाला गवसणी घातली होती.
चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएलमधला हा एकूण नववा अंतिम सामना होता. त्यातील ४ वेळा त्यांनी आता विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे चेन्नई हा सर्वाधिक आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. त्यांनी ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे.
आपण या लेखात आत्तापर्यंतचे आयपीएल विजेत्यांची नावे जाणून घेऊया.
आत्तापर्यंतचे आयपीएल विजेते –
२००८ – राजस्थान रॉयल्स
२००९ – डेक्कन चार्जर्स
२०१० – चेन्नई सुपर किंग्स
२०११ – चेन्नई सुपर किंग्स
२०१२ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१३ – मुंबई इंडियन्स
२०१४ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१५ – मुंबई इंडियन्स
२०१६ – सनरायझर्स हैदराबाद
२०१७ – मुंबई इंडियन्स
२०१८ – चेन्नई सुपर किंग्स
२०१९ – मुंबई इंडियन्स
२०२० – मुंबई इंडियन्स
२०२१ – चेन्नई सुपर किंग्स
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज
नवा विक्रमवीर! पहिल्या हंगामात बनलेला ‘तो’ पराक्रम ऋतुराजने केला आपल्या नावे
लय भारी! यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांचाच बोलबाला; केल्यात सर्वाधिक धावा






