आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२४ पासून सुरू होणाऱ्या आगामी भविष्य दौरा कार्यक्रमात आयपीएलसाठी खास दीड महिन्याचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. अर्थात यादरम्यानच्या कालावधीत कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार नाही. आयसीसीच्या मसुद्यात आयपीएलसाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा कालावधी काढून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी मार्चअंतीपासून ते मे अंतीपर्यंत हा कालावधी राखीव ठेवण्यात येत होता. परंतु याचा विस्तार करून आता जूनपर्यंत हा कालावधी वाढवण्यात आला आहे.
‘ईएसपीएन क्रिकइंफो’च्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) या निर्णयाचा विरोध करू शकतो. कारण पाकिस्तानच्या खेळाडूंवर आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रतिबंध आहे. मात्र पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांना आयसीसीच्या इतर सदस्यांकडून समर्थन मिळणे कठीण आहे. आयपीएल परदेशी खेळाडूंना जास्त पगार देते आणि त्यांच्या पगारातील १० टक्के भाग हा त्या खेळाडूच्या क्रिकेट बोर्डाला मिळतो. याच कारणामुळे अधिकतर क्रिकेट बोर्ड आयपीएलदरम्यान कोणताही क्रिकेट सामना आयोजित करत नाहीत.
याबद्दल आयसीसीच्या एका सदस्याला विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, रमीझची अडचण अशी आहे की त्याला आपल्या देशातील मीडियाला काही-ना-काही सांगायचे असते आणि तो जे योग्य आहे तेच करतो. आयसीसीच्या बैठकींमध्ये मात्र त्याचे वर्तन वेगळे असते. त्याने कधीही कोणत्या निर्णयाचा जास्त विरोध केला नाही. आयसीसीच्या बोर्डाला हा निर्णय मान्य आहे आणि खेळाडूही या निर्णयाचे स्वागत करतील.
दरम्यान यापूर्वी आयपीएलमध्ये ८ संघ सहभागी होत होते. मात्र आता गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या अतिरिक्त संघांमुळे २०२२च्या हंगामात एकूण ७४ सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात या सामन्यांची संख्या वाढून ८४ ते ९४ होऊ शकते. त्याचमुळे आयसीसीने आयपीएलसाठीची विंडो वाढवली आहे. मात्र आयपीएल सोडून इंग्लंडमधील द हंड्रेंड, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, अशा लीगसाठी आयसीसीकडून समर्पित विंडो उपलब्ध करण्यात आलेली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते ‘या’ पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित
मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत
निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे