मुंबई । जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलमध्ये खेळणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. प्रत्येक खेळाडूला इंडियन प्रीमियर लीगच्या ८ संघांपैकी एकाने त्याच्यावर बोली लावावी अशी इच्छा असते. कधीकधी असे घडते की संघ आपल्याला विकत घेऊ इच्छित असतात, परंतु असे असूनही आपण आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या बाबतीतही असेच घडले होते. त्याला एक नव्हे तर २-२ संघ आपल्या गटात सामील करुन घेण्यास इच्छुक होते, पण त्यानंतरही तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही.
आयपीएल २०२० च्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान विकत घेण्यात आले नव्हते. पण जेव्हा दोन संघातील १-१ खेळाडू काही कारणास्तव संघाबाहेर गेले तेव्हा दोन्ही संघांनी मुस्तफुजरला विकत घेण्याची तयारी दर्शविली. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानवर बोली लावण्याचा विचार केला होता, पण गोलंदाजला त्याच्याच क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला. क्रिकबझमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बांगलादेशी बोर्डाने आयपीएल खेळण्यासाठी मुस्तफिजुर रहमानला एनओसी (ना हरकर प्रमाणपत्र) दिले नव्हते.
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा हॅरी गार्नी आयपीएलमध्ये खेळणार नाही, त्यानंतर दोन्ही संघांना वेगवान गोलंदाजांची गरज होती. या दोघांनाही मुस्तफिजुर रहमान याच्यावर बोली लावण्याची इच्छा होती, पण बीसीबीने या वेगवान गोलंदाजला परवानगी दिली नाही. वास्तविक बांगलादेश बोर्डाची इच्छा आहे की, मुस्तफिजुर रहमान आयपीएलऐवजी श्रीलंकाविरुध्दच्या मालिकेत खेळला पाहिजे.
बांगलादेशचा संघ ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे आणि या दरम्यान आयपीएलही होणार आहे. बांगलादेशला 24 ऑक्टोबरपासून श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बांगलादेश क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अक्रम खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलकडून ऑफर मिळाली होती पण बीसीबीने त्याला परवानगी दिली नाही. बांगलादेशला श्रीलंकेचा दौरा करणार आहे आणि तिथे रहमान खेळणार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने माजी दिग्गज खेळाडूला दिला धक्का; आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिले नाही स्थान
या खेळाडूंच्या जर्सीवर दारूची जाहिरात पाहून पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भडकले
जगभरातील सर्वच कसोटी सामन्यात एकाच चेंडूचा वापर करावा; पहा कुणी केली मागणी
ट्रेंडिंग लेख –
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही