आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 30 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 13 धावांनी पराभूत करून गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला. दिल्लीचा प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रथम सलामीवीर धवनने अर्धशतक ठोकले, त्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किए याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम केला.
आयपीएलमध्ये पदार्पण करणारा दिल्लीचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने राजस्थानचा अष्टपैलू बेन स्टोक्सला बाद करून सामना पूर्णपणे दिल्लीकडे वळवला. या व्यतिरिक्त, सामन्यादरम्यान राजस्थानच्या डावाच्या 20 व्या षटकात असे काही घडले ज्यामुळे सामना पाहणारे प्रेक्षक हसू रोखू शकले नाही. ट्विटरवर याची बरीच चर्चा सुरु आहे
राजस्थानच्या डावाच्या शेवटच्या षटकात अष्टपैलू राहुल तेवतिया आणि फिरकीपटूं श्रेयस गोपाल खेळपट्टीवर फलंदाजी करत होते, वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे शेवटचे षटक फेकायला आला. षटकातील चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत गेला. त्यामुळे गोलंदाजी करत असलेल्या तुषारने झेल घेण्याचा प्रयत्न केला. नॉन-स्ट्राईकवर उभा असलेला फलंदाज श्रेयस गोपाल खेळपट्टीवर धाव घेण्याच्या प्रयत्नात तुषार देशपांडेला जाऊन आदळला त्यामुळे तुषार झेल घेऊ शकला नाही आणि तेवतिया बाद होण्यापासून बचावला.
https://twitter.com/chinna_943/status/1316436341471633409
This is hilarious reaction of shreyas (maine kuch nahi kiya) 😂😂😂
— Santosh Chaurasia (@ChaurasiaVi23) October 14, 2020
युवा गोलंदाज तुषार देशपांडेचा हा आयपीएलमधील पहिलाच सामना होता. त्याने या सामन्यात 37 धावा देऊन 2 बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 20 सामन्यात 50 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पैज लावून सांगतो, क्रिकेटचा असा व्हिडीओ तुम्ही यापुर्वी पाहिला नसेल
कार्तिकप्रमाणेच आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद; पाँटिंग, गंभीरचाही समावेश
याला म्हणतात अंदाज! कार्तिकच्या पायउतार होण्याची भविष्यवाणी झाली होती १२ दिवस आधीच
ट्रेंडिंग लख-
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण