जसजसा आयपीएलचा तेरावा हंगाम प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसतशी चेन्नई सुपर किंग्सच्या प्रदर्शनाला उतरली कळा लागली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) फलंदाजांच नंदनवन असणाऱ्या शारजाहच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तर चेन्नई संघ १२.२ षटकातच १० विकेट्सने पराभूत झाला. आयपीएलच्या इतिहासात १० विकेट्सने सामना गमावण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईने २० षटकात ९ विकेट्स गमावत ११४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १२.२ षटकातच एकही विकेट न गमावता चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले आणि हंगामातील ७वा विजय नोंदवला.
मुंबईकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक आणि इशान किशनने मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. इशानने ३७ चेंडूत सर्वाधिक ६८ धावांची कामगिरी केली. यात त्याच्या ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तर डी कॉकनेही ३७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४६ धावा ठोकल्या. चेन्नईकडून गोलंदाजी करताना एकही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ५२ धावा केल्या. ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार जडत त्याने ही धावसंख्या गाठली. तसेच खालच्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या गोलंदाज इमरान ताहिरनेही १० चेंडूत २ चौकारांच्या मदतीने करनला १३ धावांची साथ दिली. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
मुंबईकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने ४ षटकात १८ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरनेही प्रत्येकी २ विकेट्स चटकावल्या. तसेच नाथन-कुल्टर-नाइलनेही एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी फाटके शूज घालून गोलंदाजी करणारा ‘तो’ आता ठरलाय आयपीएलचा चमकता सितारा
भाऊच भावाला नडला! खेळायचा होता मोठा फटका, पण झाला यष्टीचीत
धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
ट्रेंडिंग लेख-
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!