रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या १३ हंगामांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एक महत्वाचा भाग आहे. तो अनेकदा आपल्या संघ सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत असताना किंवा फलंदाजी सुरू असताना त्यांना योग्य मार्गदर्शन करताना दिसत असतो. गुरुवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली किती दिलदार आहे, याचा त्याने प्रत्यय त्याने सर्वांना दिला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कलने १०१ धावांची तुफान खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ६ गगनचुंबी षटकार आणि ११ चौकार लगावले होते. विजयाचे लक्ष्य आणि शतक पूर्ण करण्यासाठी मोजक्याच धावा शिल्लक होत्या. जेव्हा ३० चेंडूत संघाला विजयासाठी अवघ्या १६ धावांची आवश्यकता होती, तेव्हा विराटने चौकार किंवा षटकार न मारता एक धाव घेतली आणि पडीक्कलला अधिकाधिक स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर १६ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरही विराटने मुद्दाम धाव घेतली नाही, जेणेकरुन पडीक्कलला पुढील षटकात स्ट्राईक मिळेल आणि तो शतक पूर्ण करेल. अखेर १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ९६ धावांवर फलंदाजी करत असलेल्या पडीक्कलने खणखणीत चौकार मारून आयपीएल कारकिर्दीतील आपले पहिले शतक पूर्ण केले होते.
विशेष बाब अशी की, विराटने यापुर्वीही असेच काहीसे केले होते. २०११ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्यावेळी देखील २२ एप्रिल २०११ रोजी दिलदार विराट कोहलीने ९९ धावांवर फलंदाजी करत असलेल्या गेलला स्ट्राइक दिली होती. त्यानंतर गेलने आपले शतक झळकावले होते.
राजस्थान रॉयल्स संघाने उभारला १७७ धावांचा डोंगर
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच तेवतीयाने देखील ४० धावांची खेळी केली होती. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले होते. २० षटक अखेर राजस्थान रॉयल्स संघाला १७७ धावा करण्यात यश आले होते.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा एकहाती विजय
राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना १० गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयात विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कलने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत नाबाद १०१ धावा केल्या. तर कर्णधार विराटने नाबाद ७२ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोरचा राजस्थानवर ‘रॉयल विजय’; चेन्नईला पछाडत गुणतालिकेत पुन्हा ‘या’ स्थानी झाले विराजमान
हर्षल पटलेचा रुद्रावतार, परागला बाद केल्यानंतर रागात तंबूत परतण्याचा केला इशारा; बघा व्हिडिओ
फक्त आरसीबी! आयपीएलमध्ये शतक करण्यात ‘विराट ब्रिगेड’ सर्वांच्या पुढे, नावे आहेत ‘इतक्या’ सेंचूरी






