इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे बिगूल वाजले आहेत. आयपीएलच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या हंगामासाठी आत सर्व संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या हंगामात पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. तसेच हा हंगाम बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरु शकतो. त्याला या हंगामात ३ मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
विराट कोहली या हंगामात कोणते ३ विक्रम करु शकतो याकडे एक नजर टाकू.
३. आयपीएलमध्ये २०० सामने खेळण्याची संधी
विराट कोहलीला आयपीएलमध्ये २०० सामने पूर्ण करण्यासाठी अजून केवळ ८ सामन्यांत खेळण्याची गरज आहे. त्याने आत्तापर्यंत १९२ सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत. तसेच आत्तापर्यंत एमएस धोनी(२०४) आणि रोहित शर्मा(२००) या केवळ २ खेळाडूंनाच आयपीएलमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळता आले आहेत.
२. टी२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा करण्याची संधी
विराट कोहली या हंगामात २६९ धावा करताच टी२० क्रिकेट प्रकारात एकूण १०,००० धावा पूर्ण करेल. सध्या विराटच्या टी२० क्रिकेट प्रकारात ३०४ सामन्यांत ९७३१ धावा आहेत. तसेच सध्या त्याच्यापुढे टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करण्यामध्ये ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, शोएब मलिक, ब्रेंडन मॅक्यूलम आणि डेव्हिड वॉर्नर आहे.
तसेच सध्या केवळ ख्रिस गेल(१३७२०), किरॉन पोलार्ड(१०६२९), शोएब मलिक(१०४८८) यांनाच टी२० क्रिकेट प्रकारात १०,००० धावांचा टप्पा पार करता आला आहे. आता यांच्या यादीत विराटसह डेव्हिड वॉर्नरचाही समावेश होऊ शकतो. वॉर्नरलाही १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी १७६ धावांची गरज आहे. त्याच्यानावावर सध्या ९८२४ धावा आहेत.
१. आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा पहिला खेळाडू
या हंगामात विराटने १२२ धावा करताच तो आयपीएलध्ये ६००० धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. आत्तापर्यंत कोणीही आयपीएलमध्ये ६००० धावा केलेल्या नाही. सध्या विराटच्या नावावर ५८७८ धावा आहे. तसेच तो सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेली सीएसके पटकावणार चौथे जेतेपद? पाहा ‘थाला’च्या संघाचे पूर्ण वेळापत्रक
ग्रँड वेलकम! एमएस धोनीने केले पुजारासह ७ नव्या खेळाडूंचे चेन्नई संघात खास स्वागत, पाहा फोटो
आरसीबीसाठी जॅकपॉट ठरणार ‘हा’ खेळाडू? केवळ ४९ चेंडूत झळकावल्यात १०४ धावा






