---Advertisement---

ईराणी कप 2025: रजत पाटीदार कर्णधार, ऋतुराज गायकवाड उपकर्णधार; या खेळाडूंना संघात संधी

On: गुरूवार, सप्टेंबर 25, 2025 7:53 PM
---Advertisement---

ईराणी कप 2025 एक ते पाच ऑक्टोबरदरम्यान रंगणार असून हा सामना रणजी ट्रॉफी विजेता विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात होणार आहे. यासाठी रेस्ट ऑफ इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला असून कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे, तर उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड झाली आहे.

रजत पाटीदार गेल्या काही काळापासून जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल झोनने दिलीप ट्रॉफी 2025 जिंकली होती आणि त्या अंतिम सामन्यात पाटीदारने 104 धावांची खेळी केली होती. याआधी त्याच्या कर्णधारपदाखाली आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली होती.

संघात विकेटकीपर म्हणून ईशान किशन आणि आर्यन जुयालला स्थान देण्यात आले आहे. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला ईशान किशन या स्पर्धेत चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल. तसेच यश धुल, शेख राशिद, तनुष कोटियन आणि मानव सुथारलाही संधी मिळाली आहे.

आकाश दीप आणि अभिमन्यु ईश्वरन इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय कसोटी संघात होते, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे त्यांना आता ईराणी कपच्या संघात स्थान मिळाले आहे.

ईराणी कप 2025 – रेस्ट ऑफ इंडिया संघ:

रजत पाटीदार (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, आर्यन जुयाल, ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यश धुल, शेख राशिद, ईशान किशन, तनुष कोटियन, मानव सुथार, गुरनूर बरार, खलील अहमद, आकाश दीप, अंशुल कंबोज आणि सारांश जैन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---