नागपुर | रणजी ट्राॅफीचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी मिळवलेला विदर्भ संघ उद्यापासून इरणी ट्राॅफी स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या शेष भारत संघाविरुद्ध दोन हात करणार आहे.
विदर्भचे नेतृत्व फैज फजल करत असून त्यांच्या संघात वसिम जाफरसारखा अनुभवी खेळाडू असणार आहे. या संघाने गेल्यावर्षी रणजीपाठोपाठ इराणी स्पर्धेचे विजेतेपदही जिंकले होते. तशीच कामगिरी करण्यासाठी हा संघ उत्सुक असणार आहे.
दुसऱ्या बाजूला विश्वचषक २०१९मधील स्थान मिळविण्यासाठीची शेवटची संधी म्हणूनच रहाणे या सामन्याकडे पहाणार आहे.
रहाणे नेतृत्व करत असलेल्या संघात मयांक अगरवाल, श्रेय़स अय्यर, हनुमा विहारी आणि इशान किशनसारखे प्रतिभावान खेळाडू आहेत.
रहाणेने नुकत्याच इंग्लंड लायन्सविरुद्ध तीन सामन्यात भारत अ चे नेतृत्व करताना २ अर्धशतके केली आहे. त्यामुळे विश्वचषकातील राखीव सलामीवीर म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
श्रेय़स अय्यर, विहारी तसेच अगरवालसाठी हा सामना आत्मविश्वास वाढवणारा असेल. हे तिघेही खेळाडू जवळपास विश्वचषक २०१९ खेळणार नाहीत.
छोट्या दुखापतीमुळे उमेश यादव या सामन्यात खेळणार आहे. यामुळे त्याच्या जागी यश ठाकूर विदर्भाकडून खेळताना दिसणार आहे.
इराणी ट्राॅफीसाठी असा आहे शेष भारत संघ- मयांक अगरवाल, इशान किशन (विकेटकिपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, स्नेल पटेल, अनमोलप्रीत पटेल, के गोथम, रोनित मोरे, धरमेंद्रसिंग जडेजा, अंकित रजपुत, संदीप वाॅरियर, टीएम हक सिंग
इराणी ट्राॅफीसाठी असा आहे विदर्भाचा संघ- फैज फजल (कर्णधार), संजय रघूनाथ, वसिम जाफर, मोहित काळे, गणेश सतिश, अक्षय वाडकर (विकेटकिपर), अदित्य सरवटे, अक्षय कर्नेवार, अक्षय वाखारे, उमेश यादव, रजनीश गुरबानी, श्रीकांत वाघ, ललित एम यादव, यश ठाकूर, आदित्य ठाकरे, अथर्व तायडे
महत्त्वाच्या बातम्या-
–असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ
–हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?
–भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके
–आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच
–…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा