भारताच्या युवा खेळाडूंनी भारलेला संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंड विरुद्ध भारत अशी दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना आयपीएल २०२२ मधील त्यांच्या प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडले गेले होते. परंतु त्यांना पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. मात्र, आता आयर्लंडविरुद्ध त्यांची पदार्पणाची संधी मिळेल, अशी पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.
उमराम मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh ) या दोघांनीही आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. उमरानने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर दिग्गज फलंदाजांचा घाम काढला होता. हंगामात त्याने निरंतरपणे १५० किमी ताशी वेगाने गोलंदाजी केली, तर एका सामन्यात तब्बल १५७ किमी ताशी गतीने चेंडू टाकला होता, जो या हंगामातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरला. त्याने यावर्षी सनरायझर्स हैदराबादसाठी २२ विकेट्स घेतल्या.
दुसरीकडे अर्शदीपच्या गोलंदाजीचा विचार केला, त्याने शेवटच्या शटकांमध्ये स्वतःचा प्रभाव पाडला. अर्शदीपला विकेट्स जास्त मिळाल्या नाहीत, पण पंजाब किंग्जसाठी त्याने शेवटच्या षटकांमध्ये किफायशीर गोलेंदाजी केली. जसप्रीत बुमराहनंतर तो दुसरा गोलंदाज ठरला, ज्याने शेवटच्या षटकांमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले.
आयर्लंडविरुद्ध या दोघांनी पदार्पणाची शक्यता यामुळे जास्त आहे की, हर्षल पटेल आणि आवेश खान या गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले जाऊ शकते. या दोघांनी नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली आहे. आगामी काळातील टी-२० विश्वचषकात देखील हे दोन्ही गोलंदाज भारतासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. अशात या दोघांवर संघ व्यवस्थापन जास्त तान टाकू इच्छित नसेल. याच पार्श्वभूमीवर अर्शदीप आणि उमरान आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भारताचा गुणवंत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन टी-२० विश्वचषकात संधी मिळण्यासाठी दावेदार आहे, परंतु अलीकडचे त्याचे प्रदर्शन समाधानकारण राहिले नाहीये. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स अंतिम सामन्यात पोहोचला, पण त्याचे वैयक्तिक प्रदर्शन अपेक्षित राहिले नव्हते. अशात आयर्लंडविरुद्ध त्याला चांगले प्रदर्शन करणे गरजेचे बनले आहे. तर दुसरीकडे राहुल त्रिपाठीला देखील मोठ्या प्रतिक्षेनंतर राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. राहुल देखील पदार्पणाच्या प्रयत्नात असेल.
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन:
ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हे फक्त पंतच करू शकतो..! रिषभने स्वत:च्याच विकेटचे केले सेलिब्रेशन, जडेजाला मारली मिठी
पतीपेक्षा पत्नी आहे एक पाऊल पुढे, आयर्लंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या या जोडीबद्दल जाणून घ्या सर्वकाही
बेन स्टोक्सने इंग्लंडच्या प्रशिक्षकाचाच विक्रम काढला मोडीत, पूर्ण केले कसोटीतील षटकारांचे ‘शतक’