भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात आयर्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी-२० मालिकेचा पहिला सामना डबलिनमध्ये आयोजित केला गेला, पण पावसाच्या कारणास्तव सामना सुरू होण्यासाठी उशीर झाला. भारतीय कर्धणरा हार्दिकने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, पण तितक्यात पाऊस पुन्हा सुरू झाला आणि सामना थांबवावा लागला.
हवामान अंदाजाच्या माहितीतून आधिच समजले होते की, मालिकेतील पहिल्या सामन्यात पाऊस बाधा निर्माण करू शकतो. पावसामुळे सर्वप्रथम सामन्याची नाणेफेक उशीरा झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतासाठी पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या हार्दिकने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण तितक्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आणि सामना सुरू होऊ शकला नाही. दरम्यान, चाहत्यांची मात्र चांगलीच निराशा झाली आहे.
आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर या सामन्यात अखेर उरमान मलिकला पदार्पणाची संधी दिली गेली. तर अनुभवी यष्टीरक्षक संजू सॅमसनला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले नाही. भारतीय वेळेनुसार सामना रात्री ९ वाजता सुरू होणार होता. परंतु रात्री १.१५ मिनिटांच्या सुमारास पाऊस शांत झाल्याचे दिसले. अशात कमी शटकांचा सामना नक्कीच खेळला जाऊ शकतो.
पहिल्या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, उमरान मलिक
आयर्लंड : अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलेनी, हॅरी टेक्टर, पॉल स्टर्लिंग, लॉर्कन टर्कर (यष्टीरक्षक), मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कॉनोर ऑल्फर्ट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोरोनावर मात केल्यानंर इंग्लंडचा घाम काढणार आर अश्विन, सराव सामन्यासाठी झाला उपस्थित
हार्दिक भारताचे गुड लक घेऊन आलाय! पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
‘रोहित नसला तर विराटला करा कॅप्टन’, ट्वीटरवर चाहत्यांची एकसुरात मागणी