आयर्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी (२८ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. आयर्लंडच्या खेळाडूंना विजय मिळण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली, पण शेवटी भारताने ४ धावांनी विजय मिळवलाच. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन मोठ्या काळानंतर राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता आणि या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. सॅमसनच्या चाहत्यांना टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याचे पहिले अर्धशतक पाहायला मिळाले.
संजू सॅमसन (Sanju Samson) अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे, जे भारतीय संघात स्वतःचे नियमित स्थान बनवू शकले नाहीत. सॅमसनला निवडर्त्यांनी अनेकदा संघातून आत बाहेर केले आहे. त्याने तब्बल सात वर्षांपूर्वी भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण एवढ्या मोठ्या काळात त्याला एकही अर्धशतक करता आले नव्हते. मंगळवारी अखेर त्याच्या टी-२० अर्धशतकाचा दुष्काळ संपला आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले.
या सामन्यात सॅमसनने ४२ चेंडूत ७७ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक १८३.३३ होता. सॅमसन आणि दीपक हुड्डा (१०४) यांच्यात १७६ धावांची भागीदारी झाली. सॅमसनच्या या टी-२० प्रकारातील पहिल्या अर्धशतकाच्या आदी त्याचे सर्वोच्च धावसंख्या ३९ होती. ही खेळी त्याने याच वर्षी फेब्रुवारी श्रीलंकेविरुद्ध महिन्यात केली होती. या खेळीचा विचार सोडला तर टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सॅमसनने कधीच ३० पेक्षा मोठी खेळी केली नव्हती.
सॅमसनच्या टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने १९ जुलै, २०१५ मध्ये भारतासाठी त्याचा पहिला टी-२० सामना खेळला होता. जिम्बाब्वेविरुद्ध त्याला ही संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना २४ चेंडूत १९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला या सामन्यात १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. सॅमसनने आतापर्यंत एकूण १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १३५.६८ च्या स्ट्राईक रेटने आणि १९.३१ च्या सरासरीने २१५ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनच्या वादळाने उध्वस्त केले सारेच विक्रम, नावावर केला टी२०तील वर्ल्ड रेकॉर्ड
कहर योगायोग! भारतासाठी शतक करणारा शंभरावा क्रिकेटर बनला हुड्डा, पहिली सेंचूरी ‘या’ दिग्गजाच्या नावे
आयर्लंडसाठी ‘कर्दनकाळ’ ठरला दीपक हुड्डा, शतक ठोकत रोहित शर्मावरही ठरला वरचढ






