---Advertisement---

4 वाइड, चौकार- षटकार आणि हॅट्ट्रीकची संधी! टी20 वर्ल्डकपच्या सामन्यातील एकाच ओव्हरमध्ये घडले हे सर्व

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 9:44 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत अनेक चॅम्पियन्स संघांनी पहिले विजय मिळवले, मात्र त्यासाठी त्यांना बरेच कष्ट करावे लागले आहे, असे दृष्य दिसत आहे. रविवारी (८ फेब्रुवारी) आयर्लंड विरुद्ध श्रीलंका सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील एका षटकात अनेक गोष्टी घडल्या. त्यामध्ये गोलंदाजाने वाइड बॉल, नो-बॉल टाकला आणि विकेट्सही घेतल्या. तसेच फलंदाजांनीही चौकार-षटकार मारले.

श्रीलंकेच्या डावातील १९व्या षटकात हे सर्व घडले. आयर्लंडकडून ते षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज बॅरी मॅककार्थी आला. त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर कामिंडू मेंडीसने चौकार मारला, तो पंचांनी नो-बॉल घोषित केला. त्यानंतर त्याने दोन वाइड बॉल टाकले. तसेच पहिल्या अधिकृत चेंडूवर मेंडिसने षटकार मारला. यामुळे मॅककार्थीने पहिल्या चेंडूतच तब्बल १३ धावा दिल्या.

मॅककार्थीने टाकलेल्या दुसऱ्या अधिकृत चेंडूवर मेंडिसने दोन धावा घेतल्या. तिसरा चेंडूही त्याने वाइड टाकला. यामुळे तिसऱ्या अधिकृत चेंडूवर पुन्हा मेंडिसने दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर मात्र मॅककार्थीचे नशीब उत्तम, त्याला विकेट मिळाली. मेंडिस ४४ धावा (१९ चेंडू) करत बाद झाला. पाचव्या चेंडूवर दसून शनाका शून्यावर परतला. यामुळे या षटकात हॅट्ट्रीकचीही संधी निर्माण झाली, मात्र सहावा चेंडू वाइड गेला आणि अधिकृत सहावा चेंडूवर श्रीलंकेला एकही धाव मिळाली नाही.

मॅककार्थीच्या त्या १९ व्या षटकात चौकार, षटकार, वाइड बॉल, नो-बॉल आणि जवळपास हॅट्ट्रीकही पाहायला मिळाली. या षटकात त्याने ११ चेंडू टाकताना १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याने ४ षटकात ४० धावा देत २ विकेट्स घेतल्या.

मॅककार्थीचे १९वे षटक- ४ (नो-बॉल), वाइड, वाइड, ६, २, वाइड, २, विकेट, विकेट, वाइड, ०.

या सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने कुशल मेंडिसचे अर्धशतक (५६ धावा) आणि कामिंडू मेंडिसच्या ४४ धावांच्या जोरावर २० षटकात ६ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. हा सामना आयर्लंडने २० धावांनी गमावला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---