---Advertisement---

टी20 क्रिकेटमध्ये आयपीएल सर्वोच्च स्थानावर, आंतरराष्ट्रीय कर्णधाराचे मोठे विधान

On: शुक्रवार, जून 24, 2022 7:31 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगबाबत (आयपीएल) अनेकांनी आपली मते मांडली आहेत. त्यातील बहुतेकांनी आयपीएल ही क्रिकेटपटूंसाठी एक चांगला पर्याय आहे असे म्हटले आहे. २००८ पासून सुरू झालेल्या या आयपीलचा यंदा १५वा हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. यामध्ये काही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय संघांमध्ये जागा मिळवली आहे. यातच आयर्लंडच्या कर्णदाराने आयपीएलबाबत महत्वाचे विधान केले आहे. 

आयर्लंडचा कर्णधार अँड्रयू बालबर्नी (Andrew Balbirnie) याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या लीगमध्ये खेळणे ही एका खेळाडूसाठी कौतुकास्पद बाब आहे. टी२० क्रिकेटसाठी ही लीग सर्वोच्च स्थानावर असून तिचे महत्व खूप आहे, असे मत त्याने व्यक्त केले आहे. सध्या तो भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे.

विलियम पोर्टरफील्ड आणि गॅरी विल्सन आयर्लंडच्या कर्णधारांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्यानंतर बालबर्नी याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. भारतीय संघ आयर्लंडला पोहोचला असून या दौऱ्यात दोन टी२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

बालबर्नीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले, “आमच्याकडे असे खूप खेळाडू आहेत जे टी२०मध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. आयपीएलमध्ये स्थान मिळवण्यासाठी किती चढाओढ होते याची आम्हाला जाणीव आहे. टी२० क्रिकेटसाठी ही आयपीएल सर्वोच्च स्थानावर आहे.”

“आमच्या संघातील अनेक खेळाडू जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये खेळतात. मात्र त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा लीगमध्ये खेळले तर खेळाडू लवकर चांगला प्रगती करतो,” असेही बालबर्नीने पुढे म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील अनेक खेळाडू या मालिकेत खेळणार आहेत. यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे. या मालिकेत दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले असून त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘भारतावर मात, आशिया चषक ताब्यात’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे सुचक विधान

आयर्लंड की इंग्लंड? ‘दादां’चे ठरलंय कोणता सामना पाहायला जायचं ते

आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---