---Advertisement---

इरफान पठाणने कंगणा राणावतला घेतले फैलावर, केले ‘असे’ ट्विट

On: गुरूवार, मे 13, 2021 8:39 PM
---Advertisement---

इस्त्रायल व पॅलेस्टाईन या दोन देशांतील संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे. हमास शहरावर झालेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकावर रॉकेट हल्ले केले जात आहेत. सन १९६६ नंतर प्रथमच लोध शहरात आणीबाणी लावली गेली आहे. त्याच प्रकरणावरून भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने एक ट्विट केले होते. आता त्यावरूनच इरफान आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात जुंपली आहे.

इरफानने केले होते असे ट्विट
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने या दोन देशांदरम्यान चाललेल्या युद्धावर ट्विट केले होते. इरफानने लिहिलेले,
‘तुमच्यात थोडी जरी मानवता शिल्लक असेल तर पॅलेस्टाईनमध्ये जे चालले आहे त्याचे समर्थन करणार नाही.’

https://twitter.com/IrfanPathan/status/1391893697101393920?s=19

त्यानंतर, केराकत विधानसभा (उत्तर प्रदेश) क्षेत्राचे आमदार दिनेश चौधरी यांनी उत्तर देताना निघाले. ‘इरफानला दुसऱ्या देशाबद्दल इतकी आपुलकी आहे. मात्र, स्वतःच्या देशात बंगाल मध्ये जे घडले त्यावर ट्विट करू वाटले नाही.’

https://twitter.com/dineshbjp09/status/1392398078368309255?s=19

कंगनाने शेअर केली स्टोरी
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिनेश चौधरी यांचे ट्वीट इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केली. त्यानंतर, इरफान पठानने याला उत्तर देताना आणखी ट्विट केले. इरफानने लिहिले, ‘माझे सर्व ट्विट हे मानवता आणि देशवासीयांसाठी असतात. यामध्ये यामध्ये त्या माणसाचा दृष्टीकोन असतो ज्याने सर्वोच्च स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. दुसरीकडे, कंगना जिचे ट्विटर अकाउंट द्वेष पसरवण्यासाठी बंद केले आहे. तिच्याकडून मला शहाणपण शिकवला जात आहे.’

https://twitter.com/IrfanPathan/status/1392690590278569985?s=19

 

इरफान पठाण नेहमी सामाजिक विषयांवर ट्विट करत आपली मते मांडत असतो. त्यामुळे काही वेळा तो ट्रोल देखील झालेला दिसून येतो.

महत्त्वाच्या बातम्या –

नाव काढल पोरीने! अवघ्या सतराव्या वर्षी शेफाली वर्मा खेळणार ‘ही’ प्रतिष्ठीत स्पर्धा

आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द होऊनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणार १०० कोटींहून अधिक रक्कम, ‘हे’ आहे कारण

स्टीव स्मिथला मिळणार ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद? टीम पेनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---