सध्या भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत आहेत. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे टी20 विश्वचषकातही सहभागी होऊ शकणार नाही. विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये असलेला दीपक चहरही आता दुखापतींशी झुंज देतोय. अगदी सर्व सुविधा असताना हे खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. मात्र, याच दरम्यान भारताचे दोन माजी खेळाडू तसेच बंधू युसुफ पठाण आणि इरफान पठाण यांनी मात्र आपल्या तंदुरुस्तीने एक आदर्श घालून दिला आहे.
भारतात नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आणि लिजेंड्स लीग क्रिकेट या निवृत्त खेळाडूंच्या दोन स्पर्धा पार पडल्या. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इरफान व युसुफ इंडिया लिजेंड्स संघाचे तर लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भिलवाडा किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत होते. या दोन्ही स्पर्धा एकाच कालावधीत होत असल्याने अनेक खेळाडूंना सातत्याने प्रवास करावा लागत होता. त्यात इरफान व युसुफ या दोन्ही संघांमध्ये प्रमुख खेळाडू असल्याने त्यांना सर्वाधिक प्रवास करावा लागला.
इरफान पठाणने नुकतेच एक ट्विट केले आहे. त्याने लिहिले, ’13 फ्लाईट, 17 सामने, 2 ट्रॉफी आणि फायनल हे सर्व काही 26 दिवसांमध्ये केले. यातील सहा सामने 2 तास प्रवास करून एकाच दिवसात खेळले.’ याच ट्वीटमध्ये त्याने सचिन तेंडुलकर व दोन्ही संघाचे फिजिओ यांचे देखील आभार मानले.
13 flights. 17 Matches 2 trophies and one finals in last 26 days. 6 matches we played on the day of 2 hours flight. Thank you for the support Paji @sachin_rt 🙏 @iamyusufpathan @llct20 @RSWorldSeries @Bhilwarakings #BlessedAndGrateful pic.twitter.com/AOImVYwe2d
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 7, 2022
इरफान आणि युसुफ यांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली. इंडिया लिजेंड्स संघाने सलग दुसऱ्यांदा रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे विजेतेपद फटकावले. तर भिलवाडा किंग्सला लिजेंड्स लीग क्रिकेटच्या अंतिम फेरी इंडिया कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, युसुफ पठाणला लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये स्पर्धेचा मानकरी म्हणून देखील गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!