विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय माजी अष्टपैलू इरफान पठानने(Irfan Pathan) रोहित शर्माच्या कारकिर्दीबाबत आणि कर्णधारपदाबाबत मोठे व्यक्तव्य केले आहे. २०११ च्या विश्वचषकावेळी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्याबाबत बोलताना इरफान पठानने रोहितच्या कर्णधारपदाची तुलना महेंद्रसिंंग धोनीसोबत (MS Dhoni) केली आहे.
इरफान पठानच्या मते, रोहित शर्मा २०११ च्या विश्वचषकानंतर पुर्णपणे बदलला आहे. या घटनेने रोहितला पुर्णपणे बदलवले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ चा आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीचे विजेतेपद जिंकले होते.
२०११ विश्वचषकानंतर रोहित शर्माला एक-एक करत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये कर्णधारपद दिले आहे. पठान माध्यमांशी बोलताना म्हणाला, “प्रत्येक खेळाडू आपल्या कारकिर्दीत याप्रकारच्या टप्प्यातून जात असतो, जेव्हा तो कामगिरी करु शकत नाही आणि त्याच्या हाती फक्त निराशा लागत असते. सध्या संघात असे दोन खेळाडू आहेत, एक म्हणजे रोहित शर्मा आणि दूसरा रविंद्र जडेजा. जडेजाने २०१७ च्या चॅम्पियन ट्राॅफीच्या अंतिम सामन्यानंतर मागे वळून पाहिले नाही आणि रोहित २०११ च्या विश्वचषकानंतर पुर्णपणे बदलला आहे.”
तो म्हणाला, “त्याने आपल्या कौशल्यांवर खूप कष्ट घेतले आहेत आणि २०१३ च्या चॅम्पियन ट्राॅफीमध्ये मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. रोहितला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या या निर्णयाने त्याची कारकिर्द बदलून टाकली. आपण धोनीबद्दल अस बोलू शकतो की तो कॅप्टनकुल आहे तर रोहित काकडीसारखा कुल आहे.”
विराट कोहलीने २०२१ च्या शेवटी टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आणि २०२२ च्या सुरुवातीला त्याने कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. यासोबतच रोहित शर्माला टप्प्या-टप्प्याने कर्णधारपदे मिळत गेली. आता रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महान भारतीय कर्णधारही बळींचा पंचक घेणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात; म्हणाले, ‘एवढी प्रतिभा…’
भारताचा ‘तोडफोड’ फलंदाज! बंगळुरू कसोटीत २८ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या पंतवर कौतुकाचा वर्षाव
Photo | भारत आणि लंकेचे खेळाडू मैदानावर उतरताच मधमाशांनी केला ‘एअरस्ट्राईक’ आणि नंतर…