भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका रविवारी (15 जानेवारी) संपली. उभयं संघातील हा मालिका भारताने 3-0 अशा अंतराने नावावर केली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे युवराज सिंग याने नाराजी व्यक्त केली. युवराजची प्रतिक्रिय पाहून भारताचा माजी अषअटपैलू इरफान पठाण याने एक भन्नाट उत्तर दिले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यावेळी स्टेडियममध्ये खुर्च्या मोकळ्या दिसत होत्या. भारतीय संघाच्या सामन्यावेळी असे चित्र दिसने सर्वांसाठीच आश्चर्याची गोष्ट आहे. भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj singh) याने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून याविषयी नाराजी व्यक्त केली आणि वनडे क्रिकेटच्या भविष्याविषयी संशय देखीव व्यक्त केला. वनडे क्रिकेट मरत आहे का? असा प्रश्न युवराजने त्याच्या फॉलोअर्सला विचारला.
युवराजने ट्वीट करत लिहिले की, “अर्धे खाली स्टेडियम माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे? वनडे क्रिकेट मरत आहे का?” युवराजने वनडे क्रिकेटविषयी उपस्थित केलेली ही शंका पाहून इरफान पठाण (Irfan Pathan) याने खास प्रतिक्रिया दिली. युवराजला उत्तर देताना लिहिले की, “भाऊ पॅड घाल, चाहते येतील.” इरफानची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे. इरफानने युवारजाला मैदानात पुनरागमन करायला सांगितल्यामुळे चाहते देखील खुश आहेत. पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स येत आहेत. दरम्यान, रविवारी या सामन्यासाठी ग्रीनफिल्ड स्टेडियमवर 17,000 चाहते उफस्थिती लावली होती. स्टेडियमची क्षमता 38,000 सिट्सची असून सिट्स मोठ्या प्रमाणात मोकळ्या होत्या.
Bhai pads pehan lo. Aajegi jantaaa
— Irfan Pathan (@IrfanPathan) January 15, 2023
सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवण्याचे कारण केरळ क्रिकेट असोसिएशनचे व्यवस्थापन कृष्णा प्रसाद यांनी सांगतिले. माध्यमांसमोर कृष्णा प्रसाद म्हणाले की, “आमच्याकडे कधीच अर्धे स्टेडियम मोकळे राहिले नव्हते. याची अनेक कारणे आहेत. आपल्याला वनडे क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात जास्त रोमांचकपणा पाहायला मिळत नाहीये. तसेच मालिकेचा निकाल कोलकात्यामध्येच लागलाहोता (भारताने 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर). तसेच विरोधी संघ श्रीलंका असल्यामुळे लोकांनी स्टेडियममध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही.’ दरम्यान, उभय संघांतील या वनडे मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर कोलकातास्थित ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये 50,000 हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. गुवाहाटीमध्येही सर्वच्या सर्व तिकिट्स विकले गेले होते. (Irfan Pathan gave a cool reply to Yuvraj Singh’s tweet about ODI cricket)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पक्ष्याने केली सूर्यकुमार यादवची नक्कल! संघसहकारी अर्शदीपही म्हणाला, ‘पाजी तुमची कॉपी…’
एक वर्षाहून अधिक काळ संघातून बाहेर असलेल्या रहाणेचे करियरविषयी मोठे भाष्य; म्हणतोय, ‘मला पहिल्यासारख…’