भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2022 मध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. या पराभवानंतर भारतीय संघ टीकाकारांच्या चांगलाच निशाण्यावर आला आहे. अनेकजण संघात सुधारणा सुचवत आहेत. आता संघातील सुधारणा सुचवणाऱ्यांमध्ये माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण देखील सहभागी झाला आहे.
टी-20 विश्वचषक आणि त्याआधी आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन समाधानकारक नव्हते. संघाच्या या निराशाजनक खेळीनंतर कर्णधार रोहित शर्मा चाहत्यांच्या चांगलाच निशाण्यावर आला आहे. अनेकजण त्याच्याकडून कर्णधारपद काढून घ्या, अशी थेट मागणी करत आहेत. पण इरफान पठाण (Irfan Pathan) याला मात्र असे अजिबात वाटत नाही. इरफानच्या मते संघाचा कर्णधार बदलल्यामुळे संघाच्या प्रदर्शनावर परिणाम होणार नाहीये. यासाठी संघाला त्याची विचारसरणी बदलावी लागणार आहे. अधिकृत ट्वीटर खात्यावरून इरफानने भारतीय संघाला काही सल्ले दिले आहेत.
इरफानने एक ट्वीट करत चार मुद्दे सांगितले, ज्यावर भारतीय संघाला काम करावे लागणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे भारतीय भारतीय संघाने त्यांच्या सलामीवीरांना मोकळेपणाणे खेळू दिले पाहिजे. किमान दोघांपैकी एकाला ही मोकळीक मिळालीच पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे संघात विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज गरजेचा आहे. तिसरा मुद्दा इरफानने सुचवला तो म्हणजे विरोधी संघांच्या विकेट्स घेण्यासाठी संघात गुणवंत वेगवान गोलंदाज हवे आहेत. चौथा आणि शेवटचा मुद्दा इरफानने सुचवला म्हणजे संघाचा कर्णधार बदलण्याची गरज नाही, तर संघाची विचारसरणी बदलण्याची गरज आहे.
Indian cricket going forward 1) Openers playing freely, At least one of them. 2) Wrist spinner (wicket taker ) is must. 3) Tear away fast bowler. 4) please don’t think changing captaincy will give us changed result. It’s the approach what needs to change.
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 15, 2022
दरम्यान, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 विश्वचषकात फलंदाजी करताना अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. रोहितच्या साधारण खेळीनंतर त्याच्याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारतीय संघ विश्वचषखानंतर तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाला आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली असे वरिष्ठ खेळाडू उपस्थित नसतील. असात हार्दिक पंड्या टी-20, तर शिखर धवन एकदिवसीय संघाचे नेतृत्व करताना दिसतील. (Irfan Pathan give advices to team india after loss against england semifinal of t20wc2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पिक्चर अभी बाकी है! पॉलीने सांगितले भविष्यातील प्लॅनिंगविषयी, मुंबई इंडियन्समध्ये दिसणार ‘या’ नव्या भुमिकेत
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने सानिया मिर्झाला दिल्या वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा, पाहाच एकदा