भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठाण याने 2010 च्या दशकात अनेक मोठे विजय भारताला मिळवून दिले. या दरम्यान त्याने अनेकदा अविस्मरणीय कामगिरी केली. त्याचमुळे त्याला भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. त्यातही इरफानचा विषय निघाला की अनेकांना आठवते ती त्याने 2006 साली पाकिस्ताविरुद्ध घेतलेली हॅट्रिक.
बरोबर 17 वर्षांपूर्वी 2006 साली त्याने कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात घेतलेली हॅट्रिक अनेकांच्या लक्षात असेल. इरफान पठाण (Irfan Pathan) कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा हरभजन सिंगनंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता. या कसोटी सामन्यात त्यावेळीचा कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पहिलेच षटक टाकण्यासाठी इरफानकडे चेंडू सोपवण्यात आला.
इरफानने पहिल्याच षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर विकेट्स घेत हॅट्रिक साजरी केली होती. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान बट याला बाद केले. सलमानने या चेंडूवर फटका मारायचा प्रयत्न केला असताना चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन द्रविडच्या हातात झेल गेला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या युनुस खान याला पाचव्या चेंडूवर इरफानने पायचीत केले. तर सहाव्या चेंडूवर मोहम्मद युसुफ याला इरफानने त्रिफळाचीत करत ही हॅट्रिक घेतली होती.
इरफानने पाकिस्तानची वरची फळी बाद केल्यानंतर मात्र, पाकिस्तानने या सामन्यात चांगले पुनरागमन करत पुढे जाऊन हा सामना 341 धावांनी जिंकला.
.@IrfanPathan grabbed a hat-trick in the very 1st over of the 3rd Test between 🇮🇳 & 🇵🇰 at The National Stadium in Karachi #OTD in 2006 (🎥:⬇️)
A stunned 🇵🇰 slipped to 39-6 before @KamiAkmal23 rescued them with 113
4 days later 🇵🇰 won the Test by 341 runspic.twitter.com/YOZYpF30Hk
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) January 29, 2022
Happy Birthday @IrfanPathan 🎂😎
Here's reliving his famous hat-trick against Pakistan. This one's from the archives #TeamIndia pic.twitter.com/CG3sV47aDU— BCCI (@BCCI) October 27, 2018
इरफानची कारकिर्द –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने 2020 मध्ये 4 जानेवारीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 1105 धावा आणि 100 विकेट्स, वनडेत 1544 धावा आणि 173 विकेट्स आणि टी20 मध्ये 172 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या इरफान एका चांगल्या समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ आहेत आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे धुरंधर, जोकोविच यादीत सर्वात अव्वल
‘जोकर’ चमकला! ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्सित्सिपासला धूळ चारत केली नदालच्या विक्रमाची बरोबरी