रायपूरच्या शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे. या मालिकेत झालेल्या इंडिया लिजेंड्स विरुध्द दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील साखळी सामन्यात इंडीया लिजेंड्स संघाने विजय मिळवला होता. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहे.
इंडियन लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघावर ५६ धावांनी विजय मिळवला. या विजयात सचिन तेंडुलकरने ६० धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. यानंतर इरफान पठाणने ड्रेसिंग रूममधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरसोबत इरफानचा मुलगा इमरान दिसून येत आहे. या फोटोमध्ये इमरानने पॅड घातलेले आहेत.
इरफानने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इमरान, मास्टर सचिन पाजीसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.” तसेच दुसऱ्या फोटोमध्ये दक्षिण आफ्रिकन लिजेंड्स संघाचा खेळाडू मखाया नतिनी देखील दिसून येत आहे.
Imran is ready to open with the master @sachin_rt paaji #cricket #Makhayantini pic.twitter.com/7OlBxJL9dD
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 14, 2021
भारतीय लिजेंड्स संघाने उभा केला २०४ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंडिया लिजेंड्सकडून सलामीला फलंदाजीला आलेला विरेंद्र सेहवाग लवकर माघारी परतला. त्यानंतर सचिन तेंडुलकरने महत्वपूर्ण ६० धावांची खेळी केली. तसेच बद्रीनाथ ४२ धावा करत रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. त्यानंतर युवराज सिंगने अवघ्या २२ चेंडूत ५२ धावांची खेळी केली.
अशाप्रकारे ३ विकेट्स गमावत इंडिया लिजेंड्सने २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका लिजेंड्स निर्धारित २० षटकात ७ बाद १४८ धावांवर गारद झाला. परिणामत इंडिया लिजेंड्सने ५६ धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG: पदार्पणवीर इशानने पूर्ण केले भारताचे ‘मिशन’, सेहवागला आठवला झारखंडचा ‘महान शिलेदार’
दुसऱ्या टी२०त पाहुण्यांचा दारुण पराभव; इंग्लंडच्या संघनायकाने ‘यांच्यावर’ फोडले पराभवाचे खापर
‘वडापाव खूपच महत्वाचा,’ सामन्यादरम्यान रोहितचा लपूनछपून नाश्ता; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया