गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत झाला. या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्वीट करत भारतीय संघाची खिल्ली उडवली होती. आता भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याने सडेतोड प्रत्युत्तर देत शहबाज शरीफ यांची बोलती बंद केली आहे.
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध 10 विकेट्सने पराभूत झाला होता. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistani PM Shehbaz Sharif) यांनी ट्वीट करत लिहिले होते की, “तर, या रविवारी, हे आहे: 152/0 विरुद्ध 170/0.” पाकिस्तानी पंतप्रधानांनी या ट्वीटमध्ये दोन धावसंख्येचा समावेश केला आहे. पहिली धावसंख्या जी आहे, ती पाकिस्तानने मागील टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध धावांचा पाठलाग करताना बनवली होती. दुसरीकडे, दुसरी धावसंख्या ही इंग्लंडने या टी20 विश्वचषकात भारताविरुद्ध बनवली होती.
https://twitter.com/CMShehbaz/status/1590667400864595968
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या या ट्वीटला प्रत्युत्तर देत इरफान पठाण (Irfan Pathan) याने लिहिले की, “तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही आमच्या सुखात सुखी आहोत आणि तुम्ही दुसऱ्यांच्या दु:खात. त्यामुळे स्वत:चा देश सुधारण्याकडे लक्ष नाहीये.”
https://twitter.com/IrfanPathan/status/1591345325360705536
खरं तर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या ट्वीटनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी या मुद्द्यावर पत्रकारांनी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला प्रश्नही विचारले. बाबर आझम याने मौन सोडत म्हटले की, “आमच्यावर कुठलाही दबाव नाहीये, पण मी माफी मागू इच्छितो. कारण, मला या ट्वीटबद्दल काहीच माहिती नाहीये. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, आम्ही विरोधी संघाविरुद्ध आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.”
रविवारी रंगणार इंग्लंड-पाकिस्तान अंतिम सामना
भारतीय संघाला पराभूत करत इंग्लंड संघाने टी20 विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता इंग्लंड आणि पाकिस्तान संघात रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. (Irfan Pathan reply to Pakistan PM Shehbaz Sharif read what he Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आख्ख्या जगाने केले टीम इंडियाला ट्रोल, पण न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून मिळाला सल्ला; म्हणाला, ‘धाडसी…’
ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची विजय हजारे ट्रॉफीत दमदार सलामी; मुंबईसाठी रहाणे चमकला