मुंबई । बरेच दिग्गज खेळाडू आपल्या आवडीच्या आणि भारतीय संघाच्या कर्णधाराविषयी सतत मत देतात. आता माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही आपले मत मांडले आहे. पठाणच्या मते, गौतम गंभीरला अधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती, तर तो सर्वोत्तम कर्णधार होऊ शकला असता.
क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत इरफान म्हणाला, “लोक बहुधा राहुल द्रविडबद्दल बोलत नाहीत, याचा अर्थ असा नाही की त्यांना राहुल आवडत नाहीत. त्याच्या नेतृत्वात भारताने धावांचा पाठलाग करत सलग 16 सामने जिंकले. चांगला निकाल देण्याच्या बाबतीत एमएस धोनी आघाडीवर आहे. धोनीकडे एक उत्तम संघ होता. ”
माजी अष्टपैलू म्हणाला, “मी सौरव गांगुलीचादेखील खूप आदर करतो. मला कर्णधार म्हणून राहुल द्रविड आणि अनिल कुंबळेबद्दलही खूप आदर आहे. गौतम गंभीरला आणखी काही सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली असती, तर तो एक उत्तम कर्णधार होऊ शकला असता. मी विराट कोहली आणि रोहित शर्माचेही कौतुक करतो, याचा अर्थ असा नाही की मी धोनीचा चाहता नाही. ”
संघाचे नेतृत्व करताना गंभीरने शंभर टक्के निकाल दिला. त्याने 6 वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि सर्व सामने जिंकले. 2010 मध्ये गंभीरने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांच्या मालिकेत बहारदार कामगिरी केली. या घरच्या मालिकेत त्याने भारतीय संघाला 5-0 ने मालिका जिंकून दिली. त्यानंतर गंभीरने सर्वाधिक 329 धावा काढल्याने तो मालिकावीर म्हणून निवडला गेला. यानंतर, डिसेंबर 2011 मध्ये, गंभीरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्याचे नेतृत्व केले. यात संघानेही विजय मिळवला.
आयपीएलमध्ये गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) दोन विजेतेपद (2012 आणि 2014)) जिंकून दिले आहेत. गंभीरने 58 कसोटी सामन्यांत 4154 आणि 147 वनडे सामन्यात 5238 धावा केल्या आहेत. त्याने 37 टी 20 सामन्यांत 932 आणि आयपीएलच्या 154 सामन्यांमध्ये 4218 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकवेळी धोनीवर दंड ठोठावणारा पंचच आता म्हणतोय धोनी जगातील सर्वात हुशार क्रिकेटपटू
-सिक्सरकिंग मैदानावर परतण्यास उत्सुक; म्हणतो, ‘मला आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळायचे’
-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही