सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. कोलकाता येथील दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला 215 धावांवर गुंडाळले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने याने अप्रतिम गोलंदाज करताना तीन बळी आपल्या नावे केले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे अनेक जण कौतुक करत आहेत. त्याच्या याच शानदार कामगिरीनंतर भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने त्याच्याबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत सिराज भारतीय संघासाठी नवा चेंडू हाताळताना दिसतोय. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पाच बळी आपल्या नावे केले आहेत. तसेच त्याने मागील वर्षी 17 सामने खेळताना 29 बळी आपल्या नावे केले होते. त्याच्या यात सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण प्रभावीत झाला आहे. तो म्हणाला,
“वनडे क्रिकेटमधील मोहम्मद सिराजची कामगिरी दखल घेण्यासारखी आहे. त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाच्या विजयात नेहमीच योगदान दिले. तो चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करतोय. त्याच्या गोलंदाजीत कमालीचे सातत्य पाहायला मिळाले आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी तो देखील दावेदार असेल.”
याच वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय गोलंदाजी अधिक सक्षम बनवण्याकडे संघ व्यवस्थापनाचा कल आहे. जसप्रीत बुमराह याच्यासह आणखी कोण वेगवान गोलंदाजीचा भार विश्वचषकात वाहतात हे पाहणे रंजक ठरेल. सध्या भारतीय वनडे संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक व अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज सातत्याने खेळत आहेत.
(Irfan Pathan Talk About Mohmmad Siraj Place In 2023 ODI World Cup India Sqaud)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकी विश्वचषकात स्पेनला पराभूत करत टीम इंडियाचा विजयी प्रारंभ
महाराष्ट्र केसरी 2023: गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षेची अंतिम फेरीत धडक