छत्तीसगढमधील रायपूर येथे ५ ते २१ मार्च दरम्यान रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक माजी दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसले होते. मात्र आता ही स्पर्धा वादात अडकताना दिसत. कारण या स्पर्धेत इंडिया लिजेंड्सकडून खेळलेले खेळाडू एकेक करुन कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. या खेळाडूंमध्ये आता इरफान पठाणचाही समावेश झाला आहे.
इरफानने सोमवारी (२९ मार्च) त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. त्याच्यापूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज स्पर्धेत खेळलेले सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण आणि एस बद्रिनाथ यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
इरफानने त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगताना म्हटले आहे की ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणे नव्हती. मी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. मी विनंती करतो की नजीकच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करुन घ्यावी. तसेच विनंती करतो की सर्वांनी मास्क घाला आणि सोशल डिस्टसिंगचे नियम पाळा.
https://twitter.com/IrfanPathan/status/1376575500680798209
अंतिम सामन्यात खेळला होता इरफान
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज २०२१ च्या अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सकडून श्रीलंका लिजेंड्सविरुद्ध इरफान सचिन, युसूफ आणि बद्रिनाथसह खेळला होता. त्याने या सामन्यात नाबाद ८ धावा केल्या होत्या. तसेच त्याने २ विकेट्सही घेतल्या होत्या. हा सामना इंडिया लिजेंड्सने १४ धावांनी जिंकला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान करत होता समालोचन –
धक्कादायक गोष्ट म्हणजे शुक्रवारी (२८ मार्च) संपलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेमध्ये इरफान समालोचन टीमचा भाग होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या ३ सामन्यांच्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यावेळी तो समालोचन करताना दिसला नव्हता. त्यामुळे अनेकांच्या मनात त्याच्या कोरोना अहवालाबद्दल शंकेची पाल चुकचुकली होती.
इरफान पठाणची कारकिर्द
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने मागीलवर्षी ४ जानेवारीला सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, वनडेत १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! रोड सेफ्टी सिरीज नडली? सचिनचा युसूफ, बद्रीनाथपाठोपाठ तिसरा संघसहकारी कोरोना पाॅझिटीव्ह
मंडळी राहुल द्रविडला मराठीत बोलताना ऐकलंय का? नसेल तर पाहा ‘हा’ व्हिडीओ
भारत विरूद्ध इंग्लंड मालिकेच्या निकालाने चार आयपीएल संघ असतील खुश, कारण आहे खास






