आयसीसीने नुकतेच जाहिर केलेल्या 2018 च्या पुरस्करांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाच बोलबाला राहिला आहे. त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.
त्याचा आयसीसीने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरव केला आहे. याचबरोबर विराटने यावर्षीचा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा आणि कसोटीपटूचाही पुरस्कार मिळवला आहे.
सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवण्याची विराटची ही तिसरी वेळ आहे. याआधी त्याने 2012, 2017 मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. तसेच विराटने यावर्षी पहिल्यांदाच सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवला आहे.
त्यामुळे एकाच वर्षात आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू, वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू हे तीनही महत्त्वाचे पुरस्कार मिळवणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
त्यामुळे आयसीसीने ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांना प्रश्न विचारला होता की विराट हा सर्वकालीन दिग्गज [Greatest of All Time’ (GOAT)] आहे असे तूम्हाला वाटते का?
https://twitter.com/ICC/status/1088126526091128834
यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेक चाहत्यांनी हो असेच उत्तर दिले आहे. तर काही चाहत्यांनी सचिन दिग्गज असल्याचे म्हटले आहे.
https://twitter.com/Manni_FCB/status/1088130959252381696
https://twitter.com/AtulViratian/status/1088264156279496704
https://twitter.com/Cassim4u/status/1088135657518784517
https://twitter.com/faisal337_/status/1088127788165476352
https://twitter.com/Shefali21335363/status/1088127394366611462
https://twitter.com/84nanikiran/status/1088157225368006656
https://twitter.com/iamajay28/status/1088127534510702593
https://twitter.com/sushant_SK6/status/1088212053653737472
https://twitter.com/CharveeG7/status/1088128281386336256
https://twitter.com/Its_With2TTs/status/1088259253784080384
विराटने 2018 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 सामन्यातील 47 डावात 68.37 च्या सरासरीने 2735 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 11 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याने हे पुरस्कार त्याला जाहिर झाल्यानंतर म्हटले होते की, “मी खूप आनंदी असून या वर्षात केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. संघानेही यावर्षात उत्तम कामगिरी केली असून मी स्वत:च्या कामगिरीतही सुधारणा केली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
–मोहम्मद शमीने जलद १०० विकेट्सचा विक्रम केला या खास व्यक्तीला समर्पित
–तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४० वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली
–केएल राहुल,हार्दिक पंड्याला मिळाली सर्वात मोठी खुशखबर, होऊ शकतो टीम इंडियात समावेश






