भारतीय महिला क्रिकेट संघ गेल्या काही दिवसात सातत्याने चर्चेत आहे. प्रशिक्षक निवडीवरून झालेला वादंग असू देत किंवा इंग्लंड दौऱ्याच्या व्यवस्थापनात बीसीसीआयने केलेला भेदभाव, महिला संघावर अन्याय होत असल्याच्या चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहेत. त्यातच बीसीसीआयने वार्षिक करारात दिलेल्या मानधनाच्या रकमेवरून या चर्चांना हवा मिळाली. आणि आता महिला संघाचे २०२० साली झालेल्या टी२० विश्वचषकाचचे मानधन अद्याप देखील स्थगित असल्याचे वृत्त समोर आले.
या वृत्तानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी याबाबत नाराजी प्रकट केली. महिला संघावर कायम अन्याय होत असल्याचा आरोपच यातून खरा ठरत असल्याचे मत क्रिकेट पंडितांनी व्यक्त केले. आता इंग्लंडची माजी खेळाडू ईशा गुहाने या प्रकरणात उडी घेतली आहे.
ईशा गुहाने सुचवला पर्याय
एका वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार भारतीय महिला संघाला मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकाचे मानधन अद्याप मिळाले नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या या विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपविजेता ठरला होता. मात्र अशी चांगली कामगिरी करून देखील त्यांचे मानधन अद्याप थकित आहे. आता या आणि अशा इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी इंग्लंडची माजी खेळाडू ईशा गुहाने एक पर्याय सुचवला आहे. तिच्या मते भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी एक प्लेयर्स असोसिएशन असावे, असे मत व्यक्त केले आहे.
ईशा गुहा म्हणाली, “महिलांमध्ये त्यांच्या प्रगतीसाठी चांगली भावना निर्माण होते. मात्र योग्य न्याय मिळण्यासाठी समान वेतना शिवाय अजून बरेच काही करणे बाकी आहे. प्लेयर्स असोसिएशन हा यातील एक सगळ्यात महत्वाचा टप्पा असेल. जर पुरुषांच्या क्रिकेट बाबत होतो तेवढा विचार महिलांच्या क्रिकेट बाबत झाला तर भारतीय महिला संघ जागतिक क्रिकेटमध्ये नक्कीच हुकूमत गाजवेल.”
Women are made to feel grateful for progress but there is still so much to be done to reach equity (& that isn’t just equal pay). Players associations are a vital part of reaching this. 🇮🇳 women will dominate the 🌍 stage when as much thought goes into the their game as the men https://t.co/W4ouvLe21x
— Isa Guha (@isaguha) May 23, 2021
रविवारी, ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात इंग्लंडची माजी क्रिकेटपटू आणि क्रीडा लेखक इसाबेल वेस्टबेरी हिने एक लेख लिहित दावा केला होता की भारतीय महिला खेळाडूंचे मागील विश्वचषकाचे मानधन अद्याप थकित आहे. या लेखात बीसीसीआयवर चांगलाच निशाणा साधण्यात आला होता. याच लेखाच्या हवाल्याने ईशा गुहाने हे वक्तव्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंड्या बंधूंनी पाळला शब्द! कोरोना रूग्णांना दिली ही मदत
‘थाला’ धोनी झाला म्हातारा? नवीन लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न