भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून १८४ धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५६ धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्माला ईश सोढीने बाद केले. सोढीने रोहितला ज्यापद्धतीने बाद केले, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
न्यूझीलंडकडून सामन्यातील १२ वे षटक टाकण्यासाठी ईश सोढी आला होता. षटकातील दुसरा चेंडू रोहित शर्माने समोर टोलावला पण ईश सोढीने एका हाताने चेंडू झेलत रोहितला बाद केले. त्याच्या या अद्भुत झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माने भारताकडून या सामन्यात सर्वाधिक ५६ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. ईश सोढीने चार षटकात ३१ धावा देत १ गडी बाद केला.
Now that is some catch.
LIVE COMMS:
???? https://t.co/BAAwfBnWVd????#INDvNZ|#NZvINDhttps://t.co/pUwaLrdzH3— ????Flashscore Cricket (@FlashCric) November 21, 2021
याच सामन्यादरम्यान रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला आहे. याबाबतीत रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहित शर्माने कोलकाता येथे अर्धशतक ठोकले आणि तीसव्यांदा त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. रोहितने टी-२० मध्ये २६ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली आहेत.
— Cricsphere (@Cricsphere) November 21, 2021
याशिवाय रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकारही पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल रोहित शर्मापेक्षा पुढे आहे. त्याने १६१ षटकार जास्त ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, त्याने १२४ षटकार मारले आहेत.
दरम्यान भारताने याआधी दोन्ही टी-२० सामने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. जयपूरमधील पहिला टी-२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला होता. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा सुरुवातीपासूनच वरचष्मा होता. भारतीय संघाने हा सामना ७ विकेटने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत
‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान
माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान






