---Advertisement---

विराटचे सोढीपुढे पुन्हा लोटांगण! टी२० मध्ये ‘इतक्यांदा’ फसवले जाळ्यात

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 10:16 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने-सामने होते. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघांना या सामन्यात विजय हवा होता. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचा डाव निर्धारित २० षटकात अवघ्या ११० धावांवर रोखला. या सामन्यात न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. मात्र, न्यूझीलंडचा अनुभवी लेगस्पिनर ईश सोढीने भारताचे महत्त्वाचे फलंदाज बाद करत धावसंख्येला वेसण घातली. भारतीय कर्णधार विराट कोहली याला बाद करत त्याने एका नव्या विक्रमाची नोंद केली.

सोढीची कंजूस गोलंदाजी
भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने अनुभवी लेगस्पिनर ईश सोढी याला संधी दिली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केलेली अप्रतिम गोलंदाजी त्याने या सामन्यातही कायम ठेवली. आपल्या २९ व्या वाढदिवशी त्याने आपल्या चार षटकांमध्ये केवळ १७ धावा देताना भारतीय कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांचे महत्वपूर्ण बळी मिळवले.

विराटला बाद करत केली नवी कामगिरी
ईश सोढी याने त्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला फक्त ९ धावांवर ट्रेंट बोल्टच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. याच बरोबर त्याने विराटला टी२० क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा बाद केले आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज बनला. सोढीने विराटला वनडे क्रिकेटमध्ये देखील तीन वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.

भारतीय फलंदाजांची हाराकिरी
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला कर्णधार केन विलियम्सन याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरविला. भारतीय संघातील कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट याने सर्वाधिक तीन तर ईश सोढीने दोन बळी मिळवले. भारतासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा याने अखेरपर्यंत नाबाद राहत २६ धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

महिंद्रांनी पाळला शब्द! ‘गोल्डन बॉय’ नीरजला भेट दिली ‘स्पेशल XUV700’

https://mahasports.in/t20-wc-2021-indvsnz-india-20-overs-7-out-110-runs/

न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ पाच भारतीय खेळाडू ठरू शकतात विजयाचे शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---