---Advertisement---

रिषभ पंतच्या झंझावाती शतकावर गर्लफ्रेंडही फिदा, आनंदाच्या भरात केलेली पोस्ट वेधतेय लक्ष

On: मंगळवार, जुलै 19, 2022 6:51 PM
rishabh-pants-girlfriend
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळला गेला. रिषभ पंतने या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठी १२५ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजायानंतर भारताने एकदिवसीय मालिकाही १-२ अशा अंतराने जिंकली. पंतच्या या शतकीय योगदानानंतर त्याची प्रेयसी ईशान नेगी देखील चर्चेत आली आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंतने एकूण ११३ चेंडू खेळले आणि १२५ धावा केल्या. यामध्ये  त्याच्या १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. ही पहिलीच वेळ होती जेव्हा रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या बॅटमधून एकदिवसीय सामन्यात शतक निघाले असेल. या जबरदस्त प्रदर्शनासाठी जगभरातील चाहते आणि दिग्गज त्याचे कौतुक करत आहेत. पण या सर्वांमध्ये त्याच्यासाठी सर्वात खास संदेश होता प्रेयसी ईशा नेगी (Isha Negi) हिचा.

भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्यत्तरात भारतीय संघाची वरची फळी स्वस्तात बाद झाली होती. पण पंत खेळपट्टीवर आल्यानंतर त्याने डाव संभाळला. पंत आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या दमदार प्रदर्शाच्या जोरावर भारताने हा सामना ४२.१ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर जिंकली. पंतने शतक ठोकल्यानंतर त्याची प्रेयसी ईशाने इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी शेअर केली. इशाच्या स्टोरीत पंत दिसत आहे आणि सोबतच “चॅम्प” असेही लिहिले आहे.

असे सांगितले जाते की, रिषभ पंत आणि ईशा मागच्या जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पंतने २०१९ मध्ये स्वतःच्या सोशल मीडियावर ईशाचे काही फोटो शेअर केले होते आणि तेव्हापासून असे सांगितले जात आहे की, हे दोघे रिलेशनमध्ये आहेत. ईशा मुळची उत्तराखंडची राहणारी आहे. पेशाने ती एक इंटीरियर डेकोरेटर आणि व्यावसायिक आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.

ईशा नेगीचे काही फोटो – 

https://www.instagram.com/p/CgI_fzXv9y_/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Cfb3ecYvRHs/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Ca1FLs0vWz5/?utm_source=ig_web_copy_link

इंग्लंडविरुद्धच्या या निर्णायस सामन्यात पंतप्रमाणे हार्दिक पंड्याचेही योगदान महत्वाचे ठरले. हार्दिकने प्रथम गोलंदाजी करताना ७ षटकात २४ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना ५५ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी पंतला सामनावीर निवडले गेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

SLvsPAK: शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ची पुनरावृत्ती! श्रीलंकेच्या फलंदाजाला केले त्रिफळाचीत

“रोहितनंतर रिषभच असेल टीम इंडियाचा कॅप्टन”; दिग्गजाने आजच केले शिक्कामोर्तबच

ENGvsIND: रिषभ पंतच्या त्या ‘थम्स अप’ इशाऱ्यामागचे रहस्य अखेर उलगडले, व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---