Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2025चा 65वा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 42 धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात खेळताना हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 231 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून 19.5 षटकांत सर्व विकेट गमावून बंगळुरू संघाला फक्त 189 धावा करता आल्या. (SRH Beat RCB By 42 Runs)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडकडून चांगली सुरुवात मिळाली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 54 धावा जोडल्या. अभिषेकने 17 चेंडूत 34 धावांची खेळी खेळली, तर हेडने 10 चेंडूत 17 धावा केल्या. त्यानंतर ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी धावसंख्या 100च्या पुढे नेली पण त्यानंतर क्लासेन 24च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. अनिकेत वर्मा जलद धावा करण्याचा प्रयत्नात बाद झाला. त्याने 9 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर नितीश रेड्डी (4) आणि अभिनव मनोहर (12) झटपट बाद झाले.
ईशान किशन मात्र एक टोक पकडून होता. दबावात त्याने 94 धावांची नाबाद खेळी खेळली. डेथ ओव्हर्समध्ये त्याने शानदार कामगिरी केली. ज्यामुळे संघ 230 धावसंख्येपर्यंत पोहचू शकला. ईशान किशनने 48 चेंडूत 94 धावा केल्या. ज्यामध्ये 7 चाैकार व 5 षटकारांचा समावेश होता. (Ishan Kishan Player Of The Match) त्याच्या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाले. (Ishan Kishan 94* Runs)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने लक्ष्याचा पाठलाग दमदार सुरूवातीनं केला. विराट कोहली (25 चेंडूत 43) आणि फिल साल्ट (32 चेंडूत 62) यांनी 7 षटकांत 80 धावांची भागीदारी केली. मात्र, नंतर फलंदाजी ढासळली. मयंक अग्रवालने 11, रजत पाटीदारने 18, आणि कर्णधार जितेश शर्माने 15 चेंडूत 24 धावा केल्या. खालच्या फळीत कोणीही दोन अंकी धावसंख्येला गाठू शकलं नाही आणि शेवटच्या षटकात बेंगळुरूची खेळी संपली. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 बळी घेतले.
???????????????????????? ???????????????????? in Lucknow! ????@SunRisers secure back-to-back wins with a convincing all-round show against #RCB ????
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
Updates ▶ https://t.co/sJ6dOP9ung#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/J5YLwtUvo3
Stylish and powerful ????
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
Ishan Kishan brings up a 28-ball 5⃣0⃣ and is leading #SRH's charge ????
Will he score his second 1⃣0⃣0⃣ of the season?
Updates ▶ https://t.co/sJ6dOP9ung#TATAIPL | #RCBvSRH | @SunRisers | @ishankishan51 pic.twitter.com/TM65DgH7gn






