---Advertisement---

राष्ट्रगीत सुरू असताना भर मैदानात इशान किशनवर ‘हल्ला’! खूप घाबरला भारतीय क्रिकेटर

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 10:00 AM
Ishan-Kishan-Attack
---Advertisement---

हरारे| भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात गुरुवारी (१८ ऑगस्ट) पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याच्यासोबत एक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाणेफेक झाल्यानंतर (INDvsZIM) सामना सुरू होण्यापूर्वी भारत आणि झिम्बाब्वेचे राष्ट्रगीत (National Anthem) गायले गेले. भारताच्या राष्ट्रगीतासाठी नेहमीप्रमाणे सर्व खेळाडू एका ओळीत मैदानावर उभे होते. परंतु राष्ट्रगीत सुरू असताना अचानक एका मोठ्या भुंग्याने (Ishan Kishan Attacked) इशानवर हल्ला केला. सर्व खेळाडूंसोबत ओळीत उभा असलेल्या इशानच्या चेहऱ्यावर तो भुंगा बसला. त्यामुळे डोळे मिटून राष्ट्रगीत गुणगुणत असलेला इशान खूप घाबरला.

https://twitter.com/rishabh2209420/status/1560196675821457408?s=20&t=5uxrqqsMNGO11r1ItZSywQ

तो भुंग्याला आपल्या चेहऱ्यावरून हटवण्यासाठी झटकन खाली वाकला. या भुंग्याने इशानचे लक्ष विचलित केले. यावेळी इशानची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तो खूप घाबरला होता. परंतु भुंगा निघून गेल्यानंतर इशानने बाजूला उभा असलेल्या कुलदीप यादवकडे पाहिले आणि तो पुन्हा राष्ट्रगीत गाण्यात मग्न झाला. सुदैवाने भुंग्याच्या हल्ल्यानंतर इशानला कोणतेही नुकसान झाले नाही.

कर्णधार केएल राहुलने जिंकली मने
दुसरीकडे भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार केएल राहुल हा देखील राष्ट्रगीतावेळी त्याने केलेल्या कृतीमुळे चर्चेत आला आहे. भारताच्या राष्ट्रगीतावेळी सर्व खेळाडूंसोबत ओळीत उभा राहिलेला राहुल च्यूइंगम खात होता. पण जसे मैदानावर भारताचे राष्ट्रगीत सुरू होणार आहे असा आवाज ऐकू आला, तसे राहुलने त्याच्या तोंडातील च्यूइंगम काढले. ते च्यूइंगम आपल्या हातात (Rahul Took Out Chewing Gum) पकडून तो राष्ट्रगीतावेळी शांतपणे उभा राहिला.

https://twitter.com/AryanMane45/status/1560163019421757441?s=20&t=CMIU_vm0qyZxFQGpixI6RA

राहुल यावेळी तोंडात च्यूइंगम ठेवून तसेच राष्ट्रगीतासाठी उभा राहू शकला असता. परंतु याने राष्ट्रगीताचा अपमान झाला असता. त्यामुळे त्याने अशी कृती केली आहे. राहुलने भर मैदानात अशी कृती करत सामना पाहणाऱ्या लाखो-करोडो दर्शकांपुढे देशभक्तीचा आदर्श ठेवला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

संतापजनक! १८ वर्षीय बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध दर्शवल्याने २५ फूटावरून दिले ढकलून

पत्नी धनश्रीला घटस्फोट देण्याच्या अफवांवर स्पष्टच बोलला चहल; म्हणाला, ‘आमच्या नात्यात दुरावा…’

कांबळीच्या मदतीला धावला ‘हा’ मराठी उद्योगपती! दिली इतक्या लाखांच्या पगाराची ऑफर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---