इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सामन्याची तुफानी सुरुवात केली. संघाचा युवा यष्टीरक्षक व तडाखेबंद फलंदाज ईशान किशन व कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या ६ षटकात ८३ धावा चोपत या आयपीएल हंगामातील सर्वाधिक पावर प्ले धावसंख्या उभी केली. ईशानने १६ चेंडूत अर्धशतक ठोकत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
ईशानचे तुफान
फलंदाजांना काहीश्या मदतगार नसलेल्या खेळपट्टीवर ईशान किशनने धावांचा पाऊस पाडला. त्याने सनरायझर्सच्या सर्व गोलंदाजांवर हल्ला चढवत शानदार ८४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार व ४ गगनचुंबी षटकार ठोकले. त्याने या खेळीदरम्यान आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने अवघ्या १६ चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल इतिहासातील हे चौथे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
या फलंदाजांचा वेगवान अर्धशतकाचा पराक्रम
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलकडे जातो. त्याने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली विरुद्ध १४ चेंडूत ही कामगिरी केली होती. या यादीत दुसर्या क्रमांकावर युसुफ पठाण व सुनील नरीन हे असून त्यांनी केकेआरसाठी खेळताना अनुक्रमे आरसीबी व सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १५ चेंडूत अर्धशतक लगावलेले. चेन्नईच्या सुरेश रैना यानेदेखील पंजाबविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक ठोकले. रैनाची ही खेळी २०१४ आयपीएलमधील क्वालिफायर २ मध्ये आलेली.
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेऑफ आधी केकेआरसाठी आनंदाची बातमी, विस्फोटक फलंदाज खेळण्यासाठी फिट
या ४ भारतीयांनी केले आहे भारताव्यतिरिक्त इंग्लंड आणि पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व






