Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्णधाराचा ‘हा’ सल्ला आला कामी, इशानने श्रीलंकेविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीचे श्रेय दिले रोहितला

कर्णधाराचा 'हा' सल्ला आला कामी, इशानने श्रीलंकेविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीचे श्रेय दिले रोहितला

February 25, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
IShan-Kishan-Rohit-Sharma

Photo Courtesy: Twitter/@BCCI


रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा विजयरथ सध्या सुसाट सुटला आहे. वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारताचा संघ श्रीलंकेविरुद्धही धमाकेदार प्रदर्शन करताना दिसतो आहे. नुकताच गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊ येते श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात (First T20I) भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने ६२ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

यजमानांच्या या विजयात युवा यष्टीरक्षक इशान किशन (Ishan Kishan) याचा मोठा हात राहिला. सामन्यानंतर त्याने कर्णधार रोहित शर्मा याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने त्याला सराव सामन्यादरम्यान स्ट्राईक रोटेट करण्यावर लक्ष देण्यास सांगितले असल्याचे इशानने म्हटले आहे. 

हेही वाचा- मराठमोळ्या ऋतुराजसाठी कर्णधार रोहित करणार त्याग? इशानसोबत युवा फलंदाजाला पाठवणार सलामीला

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात इशानने सलामीला फलंदाजी येत ८९ धावांची (Ishan Kishan 89 Runs Knock) तुफानी खेळी केली होती. ५६ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ही शानदार खेळी केली होती. तसेच त्याने रोहितबरोबर पहिल्या विकेटसाठी १११ धावांनी भागिदारीही केली होती. इशानच्या या मॅच विनिंग प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

After his splendid 56-ball 89 in the first T20I against Sri Lanka, @ishankishan51 spoke about his conversations with @ImRo45 and the inputs he has received from the #TeamIndia Captain. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/jkq0qOxcEP

— BCCI (@BCCI) February 25, 2022

या प्रशंसनीय खेळीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना इशानने रोहितला (Rohit Sharma’s Advice) त्याला दिलेल्या सल्ल्याबद्दल उलगडा केला आहे. “रोहित सर मला सांगत आले आहेत की, मी माझ्या इच्छेनुसार चेंडूला दीर्घकाळ हिट करू शकतो. पण त्यांनी मला सांगितले होते की, येणारे सामने खूप महत्त्वाचे आहेत, जिथे मी सुरुवातीला डगमगलो होतो. मला माझ्या सिंगल रोटेशनवर काम करावे लागेल असे त्यांनी मला सांगितले होते. या समस्येला सोडवण्यासाठी त्यांनी माझी भरपूर मदत केली आहे. मला नेट्समध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा सरावही त्यांनी करून घेतला,” असे इशान म्हणाला.

तसेच पुढे बोलताना त्याने सांगितले की, “त्यांनी मला सांगितले की, मी जेव्हा वाटेल, तेव्हा चेंडूला हिट करू शकतो. पण स्ट्राईक रोटेट करून मी गोलंदाजांना दबावात आणू शकतो. म्हणून मी याबद्दल रोहित भाईशी बोललो. जेव्हाही कोणता खेळाडू मोठ्या मैदानावरत खेळतो, तेव्हा त्याला खूप सारे गॅप मिळतात. त्यामुळे नेहमी चेंडूला जोराने मारण्याऐवजी चेंडूला गॅपमध्ये डक करणेही तितकेच गरजेचे असते. असे केल्यास, एक फलंदाज आपोआप शिकतो की, त्याच्या फलंदाजीत कशाची कमतरता आहे, जी त्याला पूर्ण करावी लागेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

पदार्पणात त्रिशतक ठोकणाऱ्या बिहारच्या पठ्ठ्याचा आणखी एक धमाका; फक्त चौकारांच्याच मदतीने ठोकल्या ‘इतक्या’ धावा

मराठमोळ्या ऋतुराजसाठी कर्णधार रोहित करणार त्याग? इशानसोबत युवा फलंदाजाला पाठवणार सलामीला

Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा


Next Post
Wicket-Keeper

दिग्गज ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाला तीव्र हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

Virat-Kohli-And-KL-Rahul

केएल राहुल आणि 'हा' खेळाडू आहे आयपीएलचा ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्लेअर; खुद्द 'किंग कोहली'नेच सांगितलंय नाव

Shreyas-Iyer-Rohit-Sharma

घरच्या मैदानावर रोहितच आहे टी२०चा किंग, फलंदाजीनंतर नेतृत्त्वातही बनला 'नंबर १'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143