आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली आहे. या संघात अनेक हैराण करणाऱ्या नावांचा समावेश होता. संघाची घोषणा झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएमध्ये खेळाडूंवर चांगले प्रदर्शन करण्यासाठी कसलाही दबाव नसेल. टी२० संघामध्ये निवडकर्त्यांनी रोहित शर्माचा विश्वासू ईशान किशनला निवडले आहे. ईशान किशनच्या बदल्यात भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनला संघातून वगळण्यात आहे आहे. पण, आता निवडकर्त्यांचा हा निर्णय चुकल्यासारखे वाटू लागले आहे.
आयपीएलचे दुसऱ्या टप्प्यातील सामने सध्या यूएईमध्ये खेळले जात, आगामी आगामी टी२० विश्वचषकही यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ईशान किशन चांगले प्रदर्शन करताना दिसत नाहीये. यामुळे त्याला विश्वचषकासाठी संधी देऊन चुकी झाल्यासारखे वाटू शकते. ईशान किशन खराब फाॅर्ममध्ये दिसत असून यूएईतील दोन सामन्यांमध्ये त्याने केवळ २५ धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळलेल्या १९ सप्टेंबरच्या सामन्यात तो अवघ्या ११ धावा करून बाद झाला, तसेच २३ सप्टेंबरला खेळल्या गेलेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात तो केवळ १४ धावा करू शकला.
शिखरला भारतीय निवडकर्त्यांनी कमी लेखले
भारतीय संघात शिखर धवनला संधी देण्यात आली नाही. तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू असून त्याने अनेकदा आसीसीच्या स्पर्धांमध्ये छाप सोडली आहे. त्या तुलनेत ईशान किशनने आतापर्यंत केवळ तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही याच वर्षी झाले आहे. असे असले तरी शिखरला वगळून त्याला संघास संधी दिली गेली आहे.
आयपीएलच्या आठ हंगामांमध्ये धवनने केल्या आहेत ४०० पेक्षा अधिक धावा
धवनचे टी २० क्रिकेटमधील आतापर्यंतचे प्रदर्शन पाहिले तर ते कमाल आहे. विशेेषता आयपीएलमध्ये त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. त्याने २०१६ ते २०२१ मध्ये आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच त्याने २०११ आणि २०१२ मध्येही हा कारनामा केलेला आहे. त्याने २०११, २०१२, २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२० आता २०२१ अशा आठ वेळा ४०० पेक्षा जास्त धावा काढण्याची कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये धवनने आतापर्यंत एवढे चांगले प्रदर्शन केलेले असून, बऱ्याच काळापासून तो रोहित शर्मासोबत भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका निभावत होता. तरीही त्याला टी२० विश्वचषाकासाठी संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याला विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्येही संधी मिळालेली नाही.
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
स्टॅंडबाय : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, दीपक चहर.