भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत क संघाचा एक भाग आहे. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. त्याने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे. शतकी खेळीनंतर आता इशानने मोठा संदेश दिला आहे.
इशान किशनबद्दल बोलायचे झाले तर, तो बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे त्याला बीसीसीआयने केंद्रीय करारातून बाहेर केले होते. याशिवाय त्याला भारतीय संघातही स्थान मिळालेले नाही. टी20 विश्वचषक 2024 साठीही भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, दुलीप ट्रॉफीमध्ये चांगल्या लयीत दिसला आहे, त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे.
इशान किशनने 126 चेंडूत 111 धावांची शानदार खेळी केली
इशान किशनने संधी मिळताच त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने शानदार खेळी केली. इशानने 126 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 111 धावांची लक्षणीय शतकी खेळी केली. या उत्कृष्ट खेळीद्वारे इशान किशनने भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. या शतकी खेळीनंतर तो म्हणाला की, तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी.
याशिवाय इशान किशनने एक स्पष्ट संदेशही दिला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, ‘काम अजून अपूर्ण आहे.’ यावरून ईशान किशन आगामी सामन्यांमध्येही मोठी खेळी खेळू शकतो आणि या खेळींच्या जोरावर त्याला पुन्हा भारतीय संघातील आपले स्थान मिळवायचे आहे, असा इशारा त्याने दिला आहे.
View this post on Instagram
दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, कसोटी मालिकेनंतर वर्कलोड मॅनेजमेंटमुळे रिषभ पंतला टी20 मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत इशान किशन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात पुनरागमन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्तीनंतर शिखर धवन पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये, स्पेशल टूर्नामेंटची तयारी सुरू
वनडे सामन्यातील पंचाला किती पगार मिळतो? पुरुष आणि महिला पंचांच्या पगारात किती आहे फरक?
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन