श्रीलंका आणि न्यूझीलंड (Sri Lanka And New Zealand) दोन्ही संघांमध्ये आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी श्रीलंकेने या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. ओशादा फर्नांडोचे (Oshada Fernando) 18 महिन्यांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी न केल्याने दिलशान मदुशंकाला संघात स्थान मिळवता आले नाही.
32 वर्षीय ओशादा फर्नांडोने (Oshada Fernando) नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर श्रीलंका-अ संघाकडून खेळताना पहिल्या कसोटीत 122 आणि 80 धावा केल्या. तो सामनावीर ठरला होता. त्याने मार्च 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. फर्नांडोने श्रीलंकेसाठी 21 कसोटी सामन्यांमध्ये 1,091 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघ- धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, ओशादा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, आशिता फर्नांडो, लाहिरू कुमारा, प्रभात मेंडिस, रामेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे, मिलन रत्नानायके
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळली जाणारी ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या तर श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत आहेत.
श्रीलंका-न्यूझीलंड सामन्यातील वेळापत्रक- पहिला कसोटी सामना 18 ते 23 सप्टेंबर, दुसरा कसोटी सामना 26 ते 30 सप्टेंबर दोन्ही सामने गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.
“गौतम गंभीर ट्रकवर चढला, ड्रायव्हरची कॉलर पकडली”; सहकारी खेळाडूनं सांगितला भयानक किस्सा