क्रिकेटमध्ये पंचांची भूमिकाही खूप महत्त्वाची असते. पंचांशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्याची कल्पनाही करता येत नाही. चाहते अनेकदा पंचाचा पगार जाणून घेण्यात रस दाखवतात. येथे आम्ही तुम्हाला वनडे सामन्यासाठी पंचांना दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दल सांगणार आहोत. तसेच, एखादी व्यक्ती भारतात पंच कशी बनू शकते, हे देखील तुम्ही माहिती करून घेऊ शकता.
इतर अनेक खेळांप्रमाणेच क्रिकेटमध्ये देखील पंच होण्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळलेच असण्याची गरज नाही. मात्र, तुमच्यासाठी क्रिकेट आणि या खेळाच्या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय तुमची दृष्टी चांगली असायला हवी आणि फिटनेसही चांगला असायला हवा, कारण, संपूर्ण सामन्यादरम्यान पंचाला मैदानावर उभे राहावे लागते.
सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करावे लागेल. स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा अनुभव तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यानंतर तुम्हाला राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणी करावी लागते. यानंतर तुम्ही बीसीसीआयमध्ये पंच होण्यासाठी पात्र व्हाल. मात्र, बीसीसीआयचे वरिष्ठ स्तरावरील पंच होण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. बीसीसीआय दरवर्षी स्तर 1 ची परीक्षा घेते. त्यापूर्वी, बीसीसीआय तीन दिवसांचा कोचिंग क्लासही उपलब्ध करून देते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांचा पगार त्यांच्या अनुभवावर अवलंबून असतो. हाच नियम वनडे सामन्यांमध्येही लागू होतो. एलिट पॅनलमध्ये सामील झालेल्या पंचांना प्रति सामन्यासाठी भारतीय चलनात जवळपास अडीच लाख (2 लाख 50 हजार) पगार मिळतो. गेल्या काही वर्षांत पंचांच्या पगारात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, विश्वचषकातील एका सामन्यात पंचाला अंदाजे चार लाख मानधन मिळते.
कसोटी सामन्यांसाठी देखील पंच दर दिवशी 2 लाखांपेक्षा जास्त मानधन घेतात. सामना पूर्ण पाच दिवस चालला नाही तरी, संपूर्ण सामन्याचे मानधन त्यांना दिले जाते. यासोबतच टी20 सामन्यासाठी ही रक्कम कमी होऊन, 1 लाख ते 1 लाख 50 हजार या घरात पोहोचते.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
सोनी-स्टारवर दिसणार नाही भारत-बांगलादेश मालिका, या चॅनलवर पाहा फ्री!
फक्त 58 धावा आणि किंग कोहली रचणार इतिहास! सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड धोक्यात