भारताचा अनुभव सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासानंतर धवनने चाहत्यांना आनंदाची संधी दिली.
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या पुढच्या सीझनचा तो भाग बनणार असल्याची बातमी समोर आली. अशा परिस्थितीत आता धवननेही लिजेंड्स लीग क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. नेटमध्ये सराव करताना त्याने शानदार चौकार आणि षटकार मारले. त्याचा एक व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
धवनने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो पॅडल स्वीप, स्विच हिट आणि पुल शॉट असे विविध फटके मारताना दिसत आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. धवन आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून शेवटचा दिसला होता. दरम्यान, धवन 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग 2024 स्पर्धेत गुजरात ग्रेट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. धवन व्यतिरिक्त या संघात ख्रिस गेल, मोहम्मद कैफ, जेरोम टेलरसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. धवनने हा व्हिडिओ शेअर करताना आनंद व्यक्त केला आहे आणि लिहिले आहे की, ‘परत येऊन खूप छान वाटत आहे.’
धवन त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत टी20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, भारतासाठी 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याव्यतिरिक्त धवनने 222 आयपीएल सामनेही खेळले आहेत. या कालावधीत धवनने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1759 धावा आणि आयपीएलमध्ये 6768 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 35.07 च्या सरासरीने फलंदाजी करतान धवनने 2 शतके आणि 51 अर्धशतके झळकावली आहेत.
धवन लिजेंड्स लीगमध्ये खेळणार असल्याने आता तो भारतात कोणत्याही स्तरावर स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकणार नाही. मात्र, विदेशात टी20 लीग खेळण्याची संधी ज्याच्याकडे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे सामन्यातील पंचाला किती पगार मिळतो? पुरुष आणि महिला पंचांच्या पगारात किती आहे फरक?
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
सोनी-स्टारवर दिसणार नाही भारत-बांगलादेश मालिका, या चॅनलवर पाहा फ्री!