बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. काही नवीन खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे तर काही खेळाडूंना बाहेर काढण्यात आले. आयपीएल 2024 मध्ये आपल्या कामगिरीने खूप चर्चेत आलेल्या वेगवान गोलंदाज मयंक यादवला संघात संधी मिळाली आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) पुन्हा एकदा वगळण्यात आले. निवड समितीकडून त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र, इशान किशनला संधी मिळाली नाही. मयंक यादव, हर्षित राणा आणि नितीश रेड्डी या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात इशान किशनलाही संधी मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत. यशस्वी जयस्वालचीही बांगलादेश मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत इशान याच्यासाठी मधल्या फळीत जागा तयार केली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, त्याऐवजी नितीशकुमार रेड्डी याचा संघात समावेश करण्यात आला. ईशानला सलामीवीर म्हणून पसंती दिली असती तर त्याला संघात स्थान मिळाले असते.
आता यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे दोघेही पुढच्या मालिकेतून संघात येऊ शकतात. याच कारणामुळे इशानचे भारतीय संघात पुनरागमन करणे सध्या खूपच कठीण असल्याचे दिसत आहे. त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल हे प्रबळ दावेदार दिसत आहेत. याच कारणामुळे इशानला सध्या संधी मिळणे कठीण आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितिशकुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा व मयंक यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsBAN : अभिषेक शर्मा अन् ‘या’ खेळाडूची सलामी जोडी ठरू शकते धोकादायक; माजी निवडकर्त्यांचे मत
SL vs NZ; कोण आहे हा फिरकीपटू? पदार्पण सामन्यातच घेतल्या 9 विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारे टाॅप-5 संघ