भारत आणि बांगलादेश यांच्यातील शेवटचा वनडे सामना शनिवारी (10 डिसेंबर) चट्टोग्राम याठिकाणी खेळला गेला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारताने हा शेवटचा सामना मात्र मोठ्या अंतराने जिंकला. बांगलादेशला या सामन्यात तब्बल 227 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामना जिंकल्यानंतर इशान किशन याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. इशानने या सामन्यात द्विशतक केले असून अनेक विक्रम नावावर केले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये इशान किशन (Ishan Kishan) प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. रोहितच्या जागी तिसऱ्या वनडे सामन्यात इशान किशन भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि त्याने संधीचे सोने देखील केले. इशानने या सामन्यात एकूण 131 चेंडूत 131 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 24 चौकार आणि 10 षटकार निघाले. इशान वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज बनला आहे. तो सध्या अवघ्या 24 वर्षांचा आहे.
एवढचे नाही, वनडे क्रिकेटमध्ये इशान किशन सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज देखील ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात अवग्या 126 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले. बांगलादेशमध्ये, तसेच बांगलादेशविरुद्ध वनडे सामना खेळताना यापूर्वी एवढी मोठी खेळी कोणताही फलंदाज करून शकला नव्हता. इशान किशनच्या नावाव हा एक मोठा विक्रम देखील नोंदवला गेला आहे.
भारतीय संघात तसे पाहिले तर यापूर्वी सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी वनडे द्विशतक केले आहेत. या चौघांपैकी इशानने हे द्विशतक धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने वनडे सामन्यात 264 धावांची खेळी केली होती, जी सर्वात मोठी आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर सेहवाग आहे, ज्याने 219 धावांची खेळी केली होती. आता या यादीत इशान किशनची 210 धावांची खेळी तिसऱ्या क्रमांकावर सामील झाली आहे. (Ishan Kishan holds the record for the youngest ODI double century)






