---Advertisement---

आशिया कप संघाच्या घोषणेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; ‘या’ फलंदाजाचा झाला अपघात

On: मंगळवार, ऑगस्ट 19, 2025 8:05 AM
---Advertisement---

एशिया कप 2025 साठी भारतीय स्क्वॉड जाहीर होण्याआधीच टीम इंडियाचा स्टार डावखुरा फलंदाज ईशान किशन जखमी झाला आहे. जरी 23 वर्षांचा हा ओपनर मागील दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असला, आणि या वेळी एशिया कप स्क्वॉडमध्ये निवड होण्याची अपेक्षा नव्हती, तरी त्याच्या जखमी झाल्यामुळे दलीप ट्रॉफीतील ईस्ट झोनला मोठा धक्का बसला आहे.

दलीप ट्रॉफी 28 ऑगस्ट पासून बेंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळली जाणार आहे. किशन हाताच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये तो ईस्ट झोनचे नेतृत्व करू शकणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ई-बाईकवरून पडल्यामुळे किशनच्या हाताला टाके घालावे लागले आहेत. सध्या तो रिहॅबिलिटेशनमध्ये असून पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या India A मालिकेत फिट होण्याची शक्यता आहे.

आता त्याच्या अनुपस्थितीत बंगालचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन याला ईस्ट झोनचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तर रियान पराग उपकर्णधार असेल. किशनच्या जागी ओडिशाचा आशीर्वाद स्वाइन संघात दाखल झाला आहे. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप अद्याप दुखापतीतून सावरू शकला नाही, त्याच्या जागी बिहारचा मुख्तार हुसैन संघात घेतला गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---