वेस्टइंडीज विरुद्धच्या तिसरा वनडे सामना नुकताच खेळला गेला. मंगळवारी (1 ऑगस्ट) झालेल्या या सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला. यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने जबरदस्त प्रदर्शन केले. ईशानच्या बॅटमधून या सामन्यात 64 चेंडूत 77 धावा आल्या. पण तरीदेखील त्याचे समाधान झाले नाही, असेच दिसते.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील हा तिसरा वनडे सामना त्रिनिदादमध्ये खेळला गेला. या सामन्यातील विजयानंतर संघाने वनडे मालिका 1-2 जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करून ५० षटकांमध्ये 5 बाद 351 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 36 व्या षटकात सर्व विकेट्स गमावल्या. 35.3 षटकांमध्ये यजमान संघ 151 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतासाठी 92 चेंडूत 85 धावा करणारा शुबमन गिल सामनावीर ठरला.
या सामन्यात भारतासाठी यष्टीरक्षक ईशान किशन () डावाची सुरुवात करण्यासाठी आला. ईशानने गिसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. ईशानने या सामन्यात 77 धावा केल्या, पण यष्टीरक्षक फलंदाजाचे त्यावर समाधान झाले नाहीये. ईशानला शितक करता न आल्याची खंत वाटते. तिसऱ्या वनडे सामन्यानंतर तो म्हणाला, “ज्या पध्यतीने मी फलंदाजी केली त्यावर मी समाधानी नाही. खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर मी यापेक्षा जास्त धावा करू शकत होतो. माझे वरिष्ठ खेळाडूही हेच सांगत असतात. मला मैदानात टिकून खेळलो पाहिजे होते आणि अजून धावा केल्या पाहिजे होत्या. पुढच्यावेळी नक्कीच मी असा प्रयत्न करेल. मागच्या सामन्यात काय झाले हे विसरून नवीन सामन्यासाठी शुन्यापासून तयारी करायला पहीजे, जे महत्वाचे आहे. मी एका वेळी एकाच चेंडूचा विचार करत असतो.”
दरम्यान, ईशान किशनने वेस्ट इंडीजविरुद्धच्या या वनडे मालिकेत एकून 184 धावा केल्या. या प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीर पुरस्कार दिला गेला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये ईशानने अर्धशतके केली आहेत. पहिल्या सामन्यात 52, दुसऱ्या सामन्यात 55, तर तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने 77 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणने ऐन वेळी सोडली संघाची साथ, पुढचे दोन महिने करणार ‘हे’ काम
वनडे विश्वचषकात निवडले नाही तर शार्दुल काय करणार? वेगवान गोलंदाजाने स्वतःच सांगितले