मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 ची तयारी सुरू केली आहे. यावेळी हा संघ रोहित शर्मा नाही तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.
श्रीलंकेचा माजी खेळाडू लसिथ मलिंगा निवृत्तीनंतर मुंबईच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला आहे. मलिंगा मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्ससोबत होता. नुकताच मलिंगा आणि ईशान किशनचा एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये ईशान मलिंगाची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करताना दिसत आहे. (ishan kishan Malinga bowling)
मुंबई इंडियन्सनं नुकताच ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ईशान किशन लसिथ मलिंगाशी बोलताना दिसत आहे. यानंतर तो मलिंगाच्या बॉलिंग ॲक्शनची कॉपी करतो. गोलंदाजी करण्यापूर्वी ईशानला मलिंगाची हेअरस्टाईल असलेली बनावट टोपी घालण्यात येते. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. या व्हिडिओला अवघ्या तीन तासांत 81 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून शेकडो लोकांनी तो लाइकही केला आहे.
Malinga banne ka tareeka bohot 𝒌𝒆𝒛𝒖𝒂𝒍 hai Ishan Bhai 🤣💙#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 @malinga_ninety9 pic.twitter.com/3oOk4gjbVR
— Mumbai Indians (@mipaltan) March 15, 2024
ईशान किशनची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर ती उत्कृष्ट राहिली आहे. ईशाननं 91 IPL सामन्यात 2324 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 15 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट आयपीएल धावसंख्या 99 धावा आहे. 2020 चा सीजन त्याच्यासाठी सर्वोत्तम राहिला. ईशाननं या सीजनमध्ये 14 सामने खेळताना 516 धावा ठोकल्या. या दरम्यान त्यानं 4 अर्धशतकंही झळकावली.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. हा सामना 24 मार्च रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. यानंतर त्यांचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. हा सामना 27 मार्च रोजी हैदराबाद येथे होणार आहे. मुंबईचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. 1 एप्रिल रोजी राजस्थान आणि मुंबई यांच्यात सामना होईल. संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 7 एप्रिल रोजी मुंबईत होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 पूर्वी ऋषभ पंत नेट्समध्ये करतोय हेलिकॉप्टर शॉटचा सराव, पाहा Viral Video