भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढच्या मोठ्या काळासाठी तो संघातून बाहेर असेल. पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. पण कसोटी फॉरमॅटमध्ये संघाकडे पंतच्या बदली खेळाडूच्या रूपात एक नवीन यष्टीरक्षक फलंदाज उपलब्ध असू शकतो. कसोटी संघातील यष्टीरक्षकाची जागा भरून काढण्यासाठी माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीने यांनी एका युवा खेळाडूचे नाव सुचवले आहे.
भारतीय संघाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने संघ घोषित केला आहे. या दोन कोसटी सामन्यांसाठी केएस भरत (KS Bharat) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना संघात सामील केले गेले आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्येही यांच्यातील कोणा एकाला संधी मिळू शकते. ईशान किशन आणि केएस भरत यांच्यातील कोणत्या यष्टीरक्षकाला कसोटी संघात केळण्याची संधी मिळणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
भारताचे माजी मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी याविषयी स्वतःचे मत व्यक्त केली. त्यांच्या रिषभ पंत (Rishabh Pant) याची जागा घेण्यासाठी ईशान किशन प्रबळ दावेदार आहे. माध्यमांशी बोलताना मोहम्मद अजहरुद्दीने म्हणाले की, “ईशान किशन याला भारतीय कसोटी संघात निवडले गेले आहे. मला वाटते की यष्टीरक्षक फलंदाजासाठी एक प्रबळ दावेदार आहे. तो डावखुरा फलंदाज असल्याचाही त्याला फायदा मिळेल.”
दरम्यान पंतची जागा भरण्यासाठी निवडकर्त्यांनी संघात घेतलेल्या ईशान आणि केएस भरत यांच्यातील एकाला निवडताना संघ व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागू शकते. केएल भरतने नुकचे आंध्र प्रदेश संघासाठी खेळताना दिल्ली संघाविरुद्ध 80 धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भरतच्या नावावर एक तिहेरी शतक आहे. तसेच त्याच्या नावावर एकूण 9 शतक देखील आहे. त्याने एकूण 134 प्रथम श्रेणी आणि 64 लिस्ट एक सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे 4627 आणि 1950 धावा त्याच्या नावावर आहेत. दुसरीकडे ईशान किशन भारताचा युवा आणि महत्वाचा फलंदाज बनला आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध ठोकलेल्या द्विशतकानंतर त्याला संघात नियमित जागा मिळाल्याचे दिसते. (Ishan Kishan or KS Bharat? Mohammad Azharuddin said who will play in the Test against Australia)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने विराटला दिला रणजी खेळण्याचा सल्ला; म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्ध…”
पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार