भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत सलामीला फलंदाजीला कोण येईल?, हा प्रश्न आहे.
मागील इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसोबत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने सलामीला फलंदाजीला केली होती. केएल राहुल (KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यामुळे पंतला सलामीला पाठवले गेले होते. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतूनही (T20 Series) राहुल बाहेर झाला आहे. अशात संघ व्यवस्थापनापुढे रोहितसोबत (Rohit Sharma) सलामीसाठी दोनच पर्यंत उरतात. इशान किशन (Ishan Kishan) किंवा रिषभ पंत.
इशान सलामीसाठी प्रबळ दावेदार
इशान हा एक ताबडतोब फलंदाज आहे. रोहित आणि इशानने बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकत्र डावाची सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगला ताळमेळही दिसून येतो. तसेच इशान डाव्या हाताचा फलंदाज आहे तर रोहित उजव्या हाताचा, त्यामुळे त्यांच्यात डावे-उजवे कॉम्बिनेशनही दिसून येते. इशानने आतापर्यंत १८ टी२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी १६ सामन्यांमध्ये तो सलामीवीर म्हणून खेळला आहे. इशानने या १६ सामन्यात ३१.७५ च्या सरासरीने आणि १३४.३९ च्या स्ट्राईक रेटने एकूण ५०८ धावा केल्या आहेत. त्यामुळे इशान रोहितसोबत सलामीला येण्यासाठी चांगला पर्याय आहे.
रिषभ पंतला सलामीला पाठवणे का आहे जोखीम?
पंतबाबत बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत फक्त २ टी२० सामन्यांमध्ये फलंदाजीला केली आहे आणि तो दोन्हीही सामन्यात फेल ठरला आहे. त्याने या २ सामन्यात मिळून एकूण २७ धावा केल्या आहेत. तसेच तो संघाला वेगवान सुरुवात देण्यातही अपयशी ठरला आहे. तसेच स्वत रोहितही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे जर त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही, तर त्याच्यावरील दबावही वाढेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलचं टीम इंडियातील स्थान धोक्यात, प्रचंड चर्चेतील ‘हा’ क्रिकेटर घेणार जागा
हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार
टीम इंडियाचे टी२० विश्वचषकावर लक्ष! कॅप्टन शर्मा विंडीजपासून करणार सुरूवात