भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-० ने धुव्वा उडवला आणि मालिकेवर आपले नाव कोरले. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात केएल राहुलच्या जागी ईशान किशनला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये स्थान देण्यात आले होते. तर हा सामना पाहण्यासाठी ईशान किशनच्या आई वडिलांनी देखील हजेरी लावली होती.
केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या ईशान किशनने संधीचे सोने केले आणि २१ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या साहाय्याने २९ धावांची खेळी केली. आपल्या आई-वडिलांसमोर अशी खेळी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ईशान किशन आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.
हा सामना झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ईशान किशनच्या आई-वडिलांचा फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यावर कॅप्शन म्हणून, ‘आम्हाला खात्री आहे की ईशानच्या पालकांनी काल रात्री ईडन गार्डन्सवर संस्मरणीय वेळ घालवला.’ तसेच त्यांनी ईशान किशन सोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.
ईशान किशनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला आतापर्यंत २ वनडे आणि ५ टी २० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने याच वर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. ईशान किशनने आपले स्वप्न पूर्ण केल्यानंतर आई वडिलांचे देखील स्वप्नं पूर्ण केले आहे.
What dreams are made of! ????????
We are sure Ishan's parents had a memorable time at the Eden Gardens last night. ????????#OneFamily #MumbaiIndians #INDvNZ @ishankishan51 pic.twitter.com/OgGzyPsD0Z
— Mumbai Indians (@mipaltan) November 22, 2021
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर ईशान किशनने २९ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १८४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या १७.२ षटकात १११ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ५१ धा4+वांची खेळी केली. तर टीम सेफर्टने १७ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ७३ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ‘टीम इंडिया’ पाकिस्तानात जाणार ? आयसीसीने दिली मोठी प्रतिक्रिया
रोहितच्या नेतृत्वाचा आणि निवडकर्त्यांचा चाहता बनला पाकिस्तानी दिग्गज; म्हणाला…




