आशिया चषक 2023 स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. पावसामुळे हा सामना रद्द् करण्यात आला, मात्र, या सामन्यात ईशान किशनने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. ईशानने पाकिस्तानविरुद्ध 81 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 7 चौकारासह 2 षटकार लगावले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ईशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीला आला तेव्हा गोलंदाजीचा दबदबा मैदानावर पसरला होता. भारतीय संघाची धावसंख्या 48 धावसंख्या तीन विकेट अशी होती. यानंतर चौथी विकेट 66 धावांवर पडली. एकीकडे शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ धुरळा घालत होते, तर दुसरीकडे 25 वर्षांचा ईशान आपल्या संघाला संभाळात होता.
वनडेत प्रथमच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ईशानने निर्भयपणे फलंदाजी करत आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले. पाकिस्तान गोलंदाजांचा दबदबा असताना हरिस रौफच्या एका चेंडूवर त्याने हवेत उडत शानदार षटकार ठोकला. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सामना चालू असताना हारिस रौफच्या ऑफ-साइड बाउन्सर चेंडूवर ईशान हवेत उडून आपल्या बॅटने चेंडूला कट मारला. त्याने चेंडूला चांगला वेळ दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की चेंडू थेट सीमारेषेवर गेला. या सिक्सरची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याच्या या सिक्सरचे सर्वजण कौतुक करत आहेत.
India vs Pakistan is temporary, Tapeia kutai is permanent 👍
Virat ➡️ Ishan— Sushant Mehta (@SushantNMehta) September 3, 2023
भारत आणि पाकिस्तान
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 266 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघघाचा डाव 48.5 षटकांत 266 धावांवर आटोपला. भारताकडून ईशान 82 आणि हार्दिक पाड्याने 87 धावा केल्या. यानंतर पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना रद्द झाला. (ishan kishan six video viral against harsi rauf india vs pakistan)
महत्वाच्या बातम्या-
‘भारताने सामना जिंकाला असता’, फक्त करावी लागली असती ‘ही’ कामगिरी; दिग्गज खेळाडूने केले स्पष्ट
ह्रदयद्रावक! दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंचांचे निधन, महाराष्ट्रातच घेतला अखेरचा श्वास